‘लोकहित न्यूज’ चा दणका — अखेर ओलमणीकडील ‘ते’ धोकादायक झाड वनखात्याने हटविले; प्रवाशी, स्थानिक नागरिकातून समाधान….


आ. विठ्ठल हलगेकर यांच्या सूचनेनुसार रेंजर श्रीकांत पाटील यांनी केला पाठपुरावा…

 

      ओलमणी: लोकहित न्यूज..

           खालापूर रोडवर ओलमणीकडील वळणावर असलेले ‘ ते ‘ धोकादायक झाड वनखात्याने आज हटविले . त्यामुळे भविष्यातील धोका दूर झाला आहे. लोकहित न्यूज ने याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते, त्याची दखल घेत आ. विठ्ठल हलगेकर यांनी तत्काळ खानापूर रेंजर श्रीकांत पाटील यांना सदर धोकादायक झाड प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, असे सांगत लवकरात लवकर ते हटवा अशी सूचना केली होती. त्यानुसार आज सोमवार ( 17 ) सकाळी ओलमणी फॉरेस्ट गार्ड  विठ्ठल चूनूर यांनी दोन सहकारी घेवून याबाबत कार्यवाही करतानाच सदर झड हटविले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. याबद्दल नागरिकांतून लोकहित न्यूज चे आणि तत्काळ दखल घेतल्याबद्दल आ. विठ्ठल हलगेकर आणि खानापूर रेंजर श्रीकांत पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत.

या मार्गावर आणखी काही असलेल्या अडचणी दूर करण्याची गरज…

     ओलमणीकडील ‘ ते ‘ झाड हटवण्यात आले खरे, मात्र, या मार्गावर आणखीही काही अडचणी आहेत, त्याही दूर करण्याची गरज आहे. याचाही वनखाते आमदारांनी पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया –

     सदर झाड सर्वांच्याच अडचणीचे ठरले होते. याबाबत आम्हीं अनेकवेळा निवेदन, मागणी करूनही कोणतीच कारवाई झाली नव्हती. अखेर ‘लोकहित न्यूज ‘ च्या वृत्ताची वनखाते, आमदारांनी दखल घेतली असून, तत्काळ या समस्येची सोडवणूक झाल्याबद्दल लोकहित न्यूज चे आभार…

      –यशवंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते दारोळी .

   

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *