कंत्राटदार संघटनेची थेट मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार; विरोधकांना आयते कोलीत ,सरकारला घेरणार का?
बंगळूर: लोकहित न्यूज नेटवर्क
राज्यात काँग्रेसचे सरकार येवून दोन वर्षे संपत आली असतानाच एक खळबळजनक वृत समोर येत आहे. गेल्या भाजपच्या सत्ताकाळापेक्षा पेक्षा सत्ताधारी काँग्रेसच्या काळात दुप्पट भ्रष्टाचार झाल्याची झालं जी तक्रार कंत्राला संघटनेने थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. संघटनेने 25 सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रात सरकारमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे. या वृत्ताने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले असून, सरकारच्या भवितव्याचे काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळा सुरू आहे.
काय म्हंटले आहे, त्या पत्रात, सिद्धरामय्याजी तुम्हीं विरोधी पक्षनेते होता तेंव्हा आम्हाला सत्तेत आल्यानंतर आमची प्रलंबित बिले तात्काळ मिळतील शिवाय,आमच्या सरकारच्या काळात कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही किंवा कोणाला त्रास दिला जाणार नाही असे सांगितला होता. मात्र, त्यानुसार काहीही घडले नाही. त्यामुळे तुम्हाला आता पत्राद्वारे कळविताना दुःख होत आहे. मागील सरकारच्या तुलनेत तुमच्या सरकारमध्ये अधिकच कमीशन घेतले जात असून, गेल्या तीन महिन्यांत केवळ 15 ते 20 टक्केच रक्कम एकूण बिलातील मंजूर केली जात आहे. बिले मंजूर करतांना प्रतिष्ठेचे पालन केले जात नाही. निर्मिती केंद्र आणि कर्नाटक ग्रामीण पायाभूत विकास सेवा महामंडळ लिमिटेड ( केएआर आयडीएल) सारख्या संस्थांवर निवडून आलेल्या प्रतिनिधी आणि त्यांच्या अनुयायांना (कार्यकर्त्यांना) प्रकल्प दिले जातात, ते अनुयायी वरिष्ठ कंत्राटदारांना कमिशनच्या बदल्यात सदर प्रकल्पातील कामे देतात. 40 टक्के कमिशनमुळे मागचे भाजप सरकार अडचणीत आले होते, त्यावेळीं अगदी चांगल्या योजनेने काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडले होते. आणि त्याचा परिणाम 2023 च्या निवडणुकीत दिसून आला, त्यावेळी भाजपला पराभव पत्करावा लागला होता. कंत्राटदार संघटना 32 हजार कोटींच्या थकित बिलासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे, मात्र, कोणताच प्रतिसाद मिळत नसून, उलट अधिकाऱ्यांवर करवाई करण्याची घोषणा तेवढीच दिली जात आहे. आतापर्यंत तुम्हीं आमच्या समस्या सोडवाल म्हणून आम्हीं धीर धरून होतों! असे या पत्रात नमूद करण्यात आले असून, त्यावर कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष आर. मंजुनाथ, सरचिटणीस जी. एम. रविंद्र यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणता फरक राहिला? तीच अवस्था पुन्हा पुन्हा अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत..







Leave a Reply