अध्यक्ष होताच राजू चिखलकर यांच्याकडून शाळेची चोहोबाजूंनी ‘स्वच्छता मोहिम ‘ गाव आणि परिसरातून कौतुकाचा ‘वर्षाव ‘


अध्यक्ष होताच दुसऱ्याच दिवशी विकासात्मक पाऊल; उपाध्यक्ष सर्व सदस्यांचे मोठें सहकार्य…

जांबोटी: लोकहित न्यूज

     शाळेचा अध्यक्ष कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ओलमणी ( ता. खानापुर) येथील सामाजिक कार्यकर्ते राजू उर्फ संतोष चिखलकर यांचे देता येईल! ओलमणी मराठी प्राथमिक शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी निवड होताच, दोनच दिवसात राजू चिखलकर यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ शाळेच्या स्वच्छतेपासून केला आहे. आज सकाळी शाळेच्या चोहोबाजूंनी स्वच्छता मोहीम हाती घेत, शाळेचा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे पावसाळ्यात शाळेच्या आजुबाजुला गच्च झालेल्या लहान- मोठ्या झाडी आणि कचरा स्वच्छ केल्यामुळे भविष्यात होणारा धोका दूर झाला आहे. याबद्दल अध्यक्ष चिखलकर यांचे गाव आणि परिसरातून कौतुक होत आहे. या कामात उपाध्यक्ष-  सदस्यांचेही सहकार्य लाभले आहे. यापुढेही अशीच शाळेबाबत विकास कामे हाती घेत नंदनवन करण्याचे व्रत घेतल्याचे मत राजू चिखलकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले.

    यावेळी एसडीएम सदस्य पिंटू नावलकर, किरण सु. साबळे, सुरेश बेळगांवकर, सोमाजी मांगेलकर, इंदुराव डीचोलकर , गावकरी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

      


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *