तमिळ अभिनेता विजय थलपती यांच्या रॅलीत ; चेंगराचेंगरी 38 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी…


एक मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच अभिनेता विजयने मध्येच आपले भाषण थांबवत पोलिसांना केले मदतीचे आवाहन..

चेन्नई: लोकहित न्यूज नेटवर्क

        प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजय थलपती यांनी आपल्या नविन पक्ष काढण्याच्या दृष्टीने शनिवारी करुर या ठिकाणी घेतलेल्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत  38 जण मृत्युमुखी पडले असून , 100 जण जखमी झाले आहेत. परिणामी गर्दी आटोक्यात न आल्याने ही घटना घडल्याची  प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. अशावेळी एक मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच अभिनेता विजयने मध्येच आपले भाषण थांबवत पोलिसांना मदतीचे आवाहन केले. जखमींना जवळच्याच शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पोलिस महासंचालकांशी संपर्क साधून डॉक्टरांना चांगली काळजी घेण्याचे आदेश दिला आहे. ही घटना समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या एक्सवर दुःख व्यक्त करत मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाइकांच्या दुःखात आम्हीं सहभागी आहोत अशी पोस्ट केली आहे.

    तमिळ अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या विजय थलपती यांनी राजकारण प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला असून, तमीझगा वेत्री कळगम नावाचा पक्ष काढला आहे. त्या दृष्टीने शनिवारी संध्याकाळी करुर या ठिकाणीं ही सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, अपक्षेपेक्षा गर्दी झाली होती, ती आटोक्यात न आल्याने ही घटना घडली आहे. परिणामी धावपळ आणि चेंगराचेंगरीत लहान मोठे 38 नागरिक यात मृत्यूमुखी पडले असून, प्राथमिक अंदाजानुसार 100 जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *