आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी राहणार उपस्थित; तरी उपस्थित पाहुण्यांनी वेळेवर येण्याची शाळा सुधारणा समितीची विनंती….

जांबोटी::लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
ब्रिटिशकाळाच्या आधीपासून म्हणजेच 1-6-1846 साली सुरवात झालेल्या ऐतिहासिक जांबोटी उच्च प्राथमिक मराठी शाळेत आज (दि. 21 ) रोजी स्नेह संमेलन व 7 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अशा दुहेरी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार असून, सायंकाळी 4 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल, तरी कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती शाळा सुधारणा समितीतर्फे करण्यात येत आहे..
आमदारांसह जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार…
निमित तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुके भाजप अध्यक्ष संजय कुबल, बीईओ पी.रामाप्पा, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य व जांबोटी सोसा. संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, माजी नंदगड जि. पं. सदस्य जोतिबा रेमानी, लोककल्प फाउंडेशनच्या व्यवस्थापक मालिनी बाली, बीईओ ऑफिसचे मंजुनाथ हत्ती, विनायक जकाती, माजी सभापती सयाजी पाटील, माजी तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, माजी जांबोटी मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मिलिंद डांगे, माजी जांबोटी पंचायत अध्यक्ष महेश गुरव, प्रतिष्ठित पंच शंकर ( अण्णासाहेब) कुडतुरकर, सीआरपी विठोबा दळवी , जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर, जांबोटी बाबुराव ठाकुर कॉलेजच्या प्राचार्या पूजा पाटकर यांच्यासह भागातील शाळांच्या शाळा सुधारणा समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक व सहशिक्षकांना, गावातील मान्यवरांना अमंत्रीत करण्यात आले आहे, पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांच्या सर्व पालकांनीही उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे..
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते…
कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, ओलमणी शाहु हायस्कूलचे सहशिक्षक अजित सावंत यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. यावेळी 7 वीच्या विद्यार्थांचे पालक, माजी शाळा सुधारणा समिती, होणकल सीआरपी पी. एस. सुतार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापिक व्ही. पी. घाडी यांनी स्वागत करतील तर सहशिक्षक एम.एच कालमनकर, पी पी. कोरव यांनी सूत्रसंचलनाचा कार्यभार पाहतील…






Leave a Reply