जांबोटी पोलिस स्टेशनच्या ‘क्रॅप बाईक ‘ विक्रीप्रकरणी ‘चेतन कुलकर्णी’ पोलिस सस्पेंट…?…


जिल्हा पोलिस प्रमुखांची कारवाई;; आमटेतील दोघांचा सहभाग असलेल्यांची चौकशी केली असता, या प्रकरणाचा झाला उलगडा ..

जांबोटी:;लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

अपघात प्रकरणात पोलिस स्टेशनला सीझ अर्थात जप्त केलेल्या क्रॅप बाईक (दुचाकी) विक्रीप्रकरणी जांबोटी पोलिस स्टेशनमध्ये (ओपी) सध्या पोलिस म्हणून कार्यरत असलेल्या चेतन कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलिस प्रमुखांची केल्याची माहिती लोकहित न्यूजकडे मिळाली आहे. याप्रकरणी आरोप कुलकर्णी यांना पाठीशी घालत असल्याचे कळताच जिल्हा पोलिस प्रमुख रामराजन यांनी खानापूर पोलिस निरीक्षक गवंडी यांना चांगलेच धारेवर धरल्याचे वृत्त समोर येत आहे. सदर पोलिस चेतन कुलकर्णी यांच्यावर एफआयएर (FIR)  दाखल करून सस्पेंड केल्याची माहिती डीएसपी डॉ. विरेय्या हिरेमठ यानी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

     

जेंव्हा कुंपणच शेत खाते; काय आहे हे प्रकरण; कशी झाली कारवाई…

     जांबोटी पोलिस ठाण्यात अपघातात जप्त अर्थात ( सिझ) केलेल्या दुचाकी गेल्या दोन वर्षांपासून जांबोटी पोलिस ठाण्यात (ओपी) पोलिस म्हणून कार्यरत असणाऱ्या चेतन कुलकर्णी या पोलिस हवालदारांनी आमटेतील एक युवक व मेकॅनिकलच्या सहाय्याने काही दुचाकी, सिझ झालेले दुचाकीचे इंजिन वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळताच विक्री केले. हे प्रकरण दोन वर्षांपूर्वी घडल्याचे सूत्रांकडून कळते.

कशे बाहेर आले हे प्रकरण… यात कोण कोण दोषी…?..

    महिन्यात जांबोटी गोवा रोडवर शेकडो अपघात होतात. त्यात हजारो बाईक, चारचाकी तुटतात. अर्थात, क्रॅप होतात. कोर्टाच्या कचाट्यात या दुचाकी अडकल्याने कित्येक वर्षे त्या त्याच पडून, सडून जातात. त्यात एकदोन व्यक्ती कोर्टात जाऊन दुचाकी परत मिळण्यासाठी धावपळ करतात. असेच हेही प्रकरण बाहेर आले आहे, एक व्यक्तीची दुचाकी अशीच सीझ करण्यात आली होती. ती परत मिळण्यासाठी सदर व्यक्तीने कोर्टाला अर्ज केला. त्यावर कोर्टाने सदर दुचाकी परत करण्याचा आदेश कोर्टाने बजावल्यानंतर सदर दुचाकीचा शोधाशोध सुरू झाला. यावेळी सदर दुचाकी आधीच विक्री झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लागलीच या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यात चेतन कुलकर्णी पोलिस यांनीच चोरांना साथ दिल्याचे स्पष्ट झाल्याने चेतन कुलकर्णी यांच्यावर एफआयएर दाखल करून सस्पेंड करण्यात आले. आमटेतील एक युवक व मेकॅनिकलच्या जबानीवरून या प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांची लक्तरे चव्हाट्यावर …

  खुद्द पोलिसच अशा प्रकरणात सहभागी असतील तर पोलिसांची लक्तरे चव्हाट्यावर का? येणार नाहीत. त्यामुळेच जिल्हापोलिस प्रमुखांनी कारवाईचे पाऊल उचलले, त्यामध्ये तालुका पोलिस निरीक्षक गवंडी यांनी आरोपींना पाठीशी घालत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांना समजले. त्यामुळे त्यांना सखोल चौकशीचा आदेश बजावला आहे..

प्रतिक्रिया…

    चेतन कुलकर्णी यांच्यावर एफआयएर दाखल होवून निलंबनाची कारवाई होणार आहे हे नकी आहे. क्रॅप बाईक ( दुचाकी) विक्री केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे..

   –डॉ. विरेय्या हिरेमठ, डीएसपी खानापूर…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *