जांबोटी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व दौड च्या आयोजकांतर्फे जंगी स्वागत..
जांबोटी:; लोकहित न्यूज
बेळगावचे उत्तरचे माजी आमदार तथा मराठा नेते ॲड. अनिल बेनके यांनी जांबोटी रामापूरपेठ येथील श्री दुर्गा माता देवीला आरती ओवाळून दर्शन घेतले. यावेळी त्यांचे जांबोटी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व दौडचे पदाधिकारी व गावकऱ्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व दौडचे अध्यक्ष सचिन कुडतुरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी गावचे पंच अण्णासाहेब कुडतुरकर, मिलिंद डांगे, दर्शन नाईक, अनिल डांगे, विनायक कोटिभास्कर , दौडचे मार्गदर्शक मदन कुडतुरकर, मिथुन कुंभार, प्रसाद कुडतुरकर ,सेक्रेटरी राजू कुर्लेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे माजी अध्यक्ष मनोहर गोवेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे माजी अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य मंजुनाथ मुतगी यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व दौडचें सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.






Leave a Reply