जांबोटीत दुर्गा देवीच्या मुर्तीची मोठया उत्साहात प्रतिष्ठापना!


बस स्थानक ते श्री राम मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक: फटाक्यांच्या आतषबाजीने परीसर दनावून गेला होता…

जांबोटी : लोकहित न्यूज

      सोमवारी जांबोटीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गावकऱ्यांच्यावतीने श्री दुर्गादेवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या थाटात पार पडला. बेळगांव (मच्छे) येथून आणण्यात आलेल्या सुंदर मुर्तीचा पूजेचा कार्यक्रम जांबोटी स्थानकावर पार पडला. एक सुंदर कमान उभी करण्यात आली होती. याचठिकाणी रात्री आठच्या दरम्यान ग्राम पंचायत सदस्य दौडचे अध्यक्ष सचिन कुडतुरकर, उपाध्यक्ष मारुती हळब, माजी अध्यक्ष मनोहर गोवेकर, सचिव राजू कुर्लेकर, प्रसाद कुडतुरकर, मंजुनाथ मुतगी, सुदेश कुडतूकर , सुधाकर गावडे, रामचंद्र कोलीकर, मोहन पारवडकर, संजय गावडे, मिलिंद डांगे, हवालदार बाहुबली यांच्याहस्ते पूजन करण्यात आले तर प्रतिष्ठीत पंच रत्नाकर कुडतुरकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी महिलांनी देवीला आरती ओवाळून पूजा केली.

  यावेळी मदन कुडतुरकर, मिथुन कुंभार, किरण कोलीकर, प्रवीण जांबोटकर, राजू गावडे, रामा डांगे, प्रभाकर बिर्जे, सुधीर कुडतुरकर, विक्रम बिर्जे, मयूर किनारी, बंडू गोवेकर, पांडू तलवार, यांच्यासह दौड चे सर्व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. सुशांत डांगे यांनी स्वागत केले. रामापुर येथील श्री राम मंदिराजवळ दुर्गा देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून,11 दिवस हा उत्सव साजरा होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *