जांबोटी पंचायतीचे रामेश्वर गल्लीतील समस्यांकडे दुर्लक्ष; नागरिकांचे पंचायतीला घेराव!
जांबोटी: लोकहित न्यूज..
गेल्या पंधरा वर्षांपासून जांबोटी पंचायत क्षेत्रातील जांबोटी पेठेतील रामेश्वर गल्लीत गटार कामासह कोणताच विकास झाला नसून, तीन वर्षांपासून अनेकवेळा निवेदन, पूर्वकल्पनेच्या माध्यमातून आम्हीं आवाज उठवत आहोत तरीही पांचातीकडून डोळेझाकपणा करण्यात येत आहे. यावेळी दखल न घेतल्यास पंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देताच बदली झालेले पीडीओ राजू तलवार व नवीन पीडीओ मॅडमनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून समस्या जाणून घेतल्या.

नागरिक म्हणतात…पंधरा वर्षात विकास नाहीच … या गल्लीतील निधी गेला कुठे?
माजी अध्यक्ष जयराम देसाई यांनी केलेल्या गटार कामानंतर कोणीच येथील गटारी आणि नागरी समस्यांकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप करत, आमच्या गल्लीतील विकास का? थांबला असा प्रश्न रामेश्वर गल्लीतील नागरिकांनी पंचायतीला विचारला. त्यावर कोणाकडेच उत्तर नव्हते! त्यामुळे इतक्या वर्षातील या गल्लीसाठी खर्च होणारा निधी गेला कुठे? असा प्रश्न नागरिकांनी पंचायतीला विचारत, याची चौकशी झाली पाहिजे अशी जोरदार मागणी लावून धरली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या दोन्हीं पीडीओंनी पाठपुरावा करण्याची हमी नागरिकांना दिली. निवेदन देतेवेळी दर्शन नाईक,मारुती हळब , दीपक नेवगेरे, अभिजित हलळब, समीर नेवगेरे यांच्यासह गल्लीतील युवक, महिला व नागरिक उपस्थित होते.








Leave a Reply