तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोरले ‘नाव ‘ ; त्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव….
खानापूर: लोकहित न्यूज..
नेपाळमध्ये पार पडलेल्या इंडो नेपाळ अंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या योगासन प्रकारात कु. मोतीराम गंगाराम गुरखे व कृष्णा गंगाराम गुरखे रा. बाळगुंद ( औरतगाव गवळीवाडा) यांनी प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली आहे, यामुळें खानापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले असून , त्यांची थायलंडमध्ये होणाऱ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तालुक्यातून गुरखे बंधूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्यांच्या गावी जाऊन त्याच्यावर कौतुकाची थाप मारली आहे. यावेळी भाजप नेते सुनिल प्रभू, मनोहर कदम, जोतिबा सुतार, अप्पासाहेब पाटील, मारूती हरिजन, एमडी सदानंद पाटील, राजू आपटे, महादेव मिठकर, अशोक पाटील, धोंडू पाटील, विठ्ठल मिसे, प्रकाश जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.






Leave a Reply