खानापूरच का? काय आहे असं खानापुरात.. मलिदा! ; एकदा नेमणूक झाली की, किमान दोन वर्षे तरी सर्विस अनिवार्य!
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
तालुक्यात आज (बुधवारी -26) एकच कुतूहलाचा विषय सुरू होता. तो म्हणजे मी तहसिलदार की तू! असा. असोगा येथील न्यायालयीन आदेशावर वेळेत कऱ्यिवाही हाती न घेतल्याच्या कारणावरून दुंडाप्पा कोमार यांची न्यायालयाच्याच निर्देशावरून बदली करण्यात आली, अन् त्याठिकाणी मंजुळा नाईक यांची वर्णी लागली. त्या रूजू होवून आठवडाही लोटतो ना लोटतो तेच बुधवारी (26) दोघांमध्ये ‘संगीत खुर्ची ‘ सारखा प्रकार पहायला मिळाला. झाले असे सध्याच्या तहसिलदार मंजुळा नाईक या जेवणासाठी बाहेर गेल्या अन् त्याचवेळी खानापुरात दाखल झालेले दुंडाप्पा कोमार हे तहसिलदारच्या खुर्चीवर बसले, तेवढ्यात मंजुळा नाईक यांनी येताच तू तू मैं मैं सुरू झाले. हा हा म्हणता म्हणता ही बातमी बेळगावपर्यंत कळली अन् लगेच एसी (प्रांताधिकारी ) श्रवण नाईक यांनी तत्काळ खानापुरला दाखल होवून मध्यस्ती केली. आणि दोघांनाही शांत केले. शिवाय दोघांनीही आपापला अहवाल सादर करण्याची सूचना केली. खानापूरसाठी तेही मुख्य पदासाठी चढाओढ का? आणि कशासाठी अधिक मलिदा ( पैशे) मिळवण्यासाठी ही धडपड असल्याची चर्चा रंगली आहे.
…सध्या दिघेही खानापुरचे तहसीलदार नाहीत; ताबा प्रांताधिकारी यांच्याकडेच …
एकाची न्यायालयाच्या आदेशानुसार बदली झाली तर दुसऱ्याची ती जागा भरण्यासाठी म्हणून रुजू होण्याचा आदेश मिळाला आहे. यामध्ये मोठा पेच निर्माण झाला असून, तो सोडवण्यासाठी सद्या तरी वरिष्ठांच्या आदेशाची वाट बघावी लागणार एवढेच! त्यामुळे तोपर्यंत एसी (प्रांताधिकारी) श्रवण नाईक यांच्याकडेच खानापूरचा ताबा राहील.
सर्वांना खानापुरच का बरे आवडीचे; हा चर्चेचा विषय…
एक तर 80 टक्के तालुका मराठी भाषिक आणि त्यात खेड्यांनी व्यापलेला तालुका म्हणून खानापुरची ओळख आहे. शिवाय येथील भोळी भाबडी जनता असल्याने खायला अर्थात् पैशे कमावण्याची भरपूर संधी मिळत असल्याने हाच तालुका संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांना आवडीचा आहे. प्रकाश गायकवाड यांनी कोटींची संपत्ती जमवत 10 हून अधिक एककर जमिन बळकावली आहे. शिवाय ते रयतावासह इतर कामांसाठी मू मांगी रक्कम घेत होते. त्यामुळे खानापुर हे सोन्याची अंडी देणारे ठिकाण आहे, हे सर्वच आधिकर्याना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच आधिकारी खानापुर सोडायला खाल वर बघत…
काय सांगतो नियम; काय होणार दोघांचेही….?
एखाद्या तालुक्यासाठी तहसीलदार म्हणून निवड झाली की, किमान दोन वर्षे तरी सर्विस अनिवार्य आहे. अर्थात दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाच पाहिजे, असे आहे..त्या नियमानुसार पाहिल्यास कोमार यांचे एक पाऊल पुढे आहे, तर दूसरीकडे न्यायालयाचा निर्णय कायम राहिला तर नाईक यांचा शिक्का उजळ राहील. त्यामुळे येणारा काळच सांगेल की, तहसीलदार कोण तो!
…पण, सध्याचे तहसीलदारपद महागडे ठरत आहे; ते मिळवण्यासाठी पंचवीस ते तीस लाख हवेत….
खानापूर असो वा कोणताही तालुका घ्या, त्याठिकाणी तहसीलदार , हेस्कॉम तालुका आधिकारी किंवा सीपीआय पद मिळवणे म्हणजे वीस खोके सबकुच ओके असे म्हणावे लागेल. या तींन्हीही पदासाठी किमान 25 ते 30 लाख मोजले पाहिजेत. मग ते कोणाकडे जातात, त्याचे भागीदार कोण कोण हा चिंतनाचा विषय असला तरी… आम्हीच जनतेचे कैवारी म्हणून व्हाईट शर्ट घालून मिरवणाऱ्यांचा यात सहभाग नक्कीच असणार आहे यात तिळमात्र शंका नाहीं. आणि तेथूनच सामान्य नागरिकांच्या लुटीचे प्रकार सुरू होतात. एवढे एवढे पैसे मोजून पद मिळवणारे आधिकारी मग, सामान्य नागरिकांकडून पैशे उकळून खाली झालेले खोके भरतात. हीच तक्रार व्हाईट शर्टवाल्यांकडे नागरिकांनी घेवून गेल्यास त्यावेळी नुसतेच डोळे मारून वेळ निभावून नेण्यात येते. त्यामुळे यात भरडला कोण? तर सामान्य नागरीक!
प्रतिक्रिया –
एकाची बदली न्यायालयाकडून झाली आहे तर दुसऱ्याची निवड ही चीफ सेक्रेटरी यांच्याकडून झाली आहे . त्यात विषय असा आहे, की, कोर्टाच्या आदेशाचा उल्लेख मंजुळा नाईक यांच्या नेमणुकीत असेल तर त्या कायम राहतील, नसेल तर त्यांना हे पद सोडावे लागेल. दोघांचाही निर्णय वरिष्ठ घेतील. पण, नियमानुसार दुंडाप्पा यांनाच अधिक चान्स असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे..
ॲड. ईश्वर घाडी, खानापुर बार असोसिएशनचे अध्यक्ष.






Leave a Reply