पिडीओ राजू तळवार ,जांबोटी पंचायत (स्टाप) अधिकाऱ्यांकडून ‘मी टार्गेट’ : नागेश कांबळे यांची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार….


ओलमणीत 15 फायनान्स फंडातून झालेल्या कामांची माहिती मागितल्यावरून मला त्रास दिला जातोय; 2015- 2021 सालातील मागितली होती माहिती…

जांबोटी पंचायतीचा पंचनामा -1

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        जांबोटी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील  215 ते 2021 सालातील 15 वा आयोग फंडातून मागासवर्गीय (एससीएसटी) समाजासाठी किती ? कामे झाली, याची माहिती मी मागितली होती. ती माहिती देणे दूरच उलट मला माहिती देतो म्हणून माहिती हक्क आयोगासमोर सांगणाऱ्या राजू तळवार , जांबोटी पंचायतीच्या सर्व ( स्टाफ) अधिकाऱ्यांकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत जिल्हा भीम आर्मी एकता मिशनचे प्रधान सचिव नागेश कांबळे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दिल्याची माहिती, लोकहित न्यूज शी व्हिडिओच्या माध्यमातून बोलतांना दिली.

      

पिडीओ राजू तळवार यांच्याकडून केस मागे घेण्यासाठी 1 लाखाचे आमिष; नागेश कांबळे..

      मी एक दलीत नेता असून, जांबोटी पंचाईत कार्यक्षेत्रातील 15 फायनान्स फंडातून 2015 ते 2021 सालात झालेल्या कामांची माहिती, मी आरटीआय अंतर्गत मागितली होती. ती दोनतीन वर्षे गेली तरी पंचायतीने महिती दिली नाही, म्हणून मला माहिती हक्क आयोगाकडे तक्रार करावी लागली असेही कांबळे यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले. 2015 ते 2021 सालची माहिती 2022 साली पदावर असलेले राजू तळवार पिडीओ यांच्याकडे आरटीआय अंतरावर माहिती मागितली होती. त्यांनी कायदेशीर वेळेत महिती दिलीच नाही.त्यामुळे मला राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार करावी लागली. माहिती देण्याचे सोडून उलट मला धमकावण्याच्या घटना अधिकच घडत आहेत. पिडीओ राजू तळवार यांच्याकडून 1 लाखाचे आमिष दाखवण्यात आले, शिवाय पंचायत कर्मचाऱ्यांकडून नाना तऱ्हेने त्रास दिला जात आहे. माझ्या जीवाला काही तरी वाईट बरे झाले तर याचा पंचायत जबाबदार असेल असेही नागेश कांबळे यांनी सांगितले. या

…….त्या माहितीत मोठे घबाड लपले आहेत का?

        जांबोटी पंचायत कार्यक्षेत्रातील 14 आणि 15 वा आयोग फंडातून मागासवर्गीय समाजासाठी झालेल्या कामांची माहिती देण्याची मागणी आरटीआयअंतर्गत 2022 साली विचारली होती. त्याला आरटीआय कायद्यानुसार माहिती देण्याचे दिवस संपले तरी पंचायतीकडून माहिती देण्यात आली नाही. उलट माहिती विचारल्यापासून मला नाना तऱ्हेने त्रास दिला जात आहे, असे नागेश कांबळे यांनी माहिती आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही माहिती वर्षांवर्षे उलटली तरी ही माहिती का? बर दिली जात नाही…या माहितीतून मोठे घबाड लपले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे..

प्रतिक्रिया

     मी एक दलीत नेता असून, माझ्या समाजासाठी सरकारी फंड किती आला, किती खर्च केला हे विचारण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मी आरटीआयअंतर्गत माहिती विचारली आहे. ती देण्याऐवजी मला त्रास दिला जात आहे, म्हणून मी माहिती हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार मला न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अन्यथा माझ्या जीवाला कोणतीही हाणी झाली तर याला पीडियो राजू तळवार व जांबोटी पंचायतीचा सर्व (स्टाफ) अधिकारी जबाबदार असतील…

    –नागेश कांबळे, भीम आर्मी एकता मिशनचे प्रधान सचिव…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *