अटीतटीच्या सामन्यात अखेर 5 गडी राखून विजय आशिया कपवर कोरले नाव ; कुलदीप यादवची चमकदार कामगिरी..
दुबई: लोकहित न्यूज नेटवर्क
आशिया कपसाठी रविवारी झालेल्या भारत -पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत पुन्हा एकदा आशिया कपवर आपले नाव कोरले आहे. प्रथम फलंदाजी करताना कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानने 146 धावा इतकेच लक्ष गाठता आले. पाकिस्तानकडून फरहान 57 तर फकर जमान 46 धावा , या दोघांचे योगदान वगळता इतर फलंदाज सपशेल फेल गेले. तर 146 धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्येच भारतीय फलंदाजी थोडीशी अडकळल्याचे दिसून आले. कर्णधार सूर्यकुमार यादव (1), अभिषेक शर्मा( 5) तर शुभमन गिल (12) असे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अशावेळी तिलक वर्माने मैदानात आपले पाय घट्ट रोवून अर्धशतक पूर्ण केले, त्याला संजू सॅमसन, शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांची चांगली साथ मिळाली. कुलदीप यादव 4, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदिप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर यष्टिरक्षक संजू सॅमसनने दोन अप्रतिम झेल घेत पाकिस्तानच कंबरड मोडल. आणि तिथेच पाकिस्तानचा डाव असफल ठरला.






Leave a Reply