बांधकाम खात्याला आदेश; नवीन रस्ता लवकरच मंजूर करण्याची गावकऱ्यांना हमी…
खानापूर: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
आंबोळी क्रॉस ते कान्सूली ( ता. खानापूर) रस्ता अत्यंत खराब झाला असून, तो तत्काळ दुरुस्त करण्याचं आदेश सा. विठ्ठल हलगेकर यांनी तालुका पीडब्लूडी अधिकाऱ्यांना आदेश दिला. शिवाय या रस्त्यासाठी लवकरच निधी मंजूर करून नविन रस्ता करून देण्याची हमी आ. हलगेकर यांनी गावकऱ्यांना दिली. मळव, आंबोळी, निलावडे,कोकणवाडा, बांदेकरवाडा गावच्या गावकऱ्यांनी आज आ. विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्याची लगेच दखल घेत अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत तत्काळ सदर रस्ता दुरुस्त करण्याची सूचना केली. यावेळी सातेरी पार्शेकर, शंकर शास्त्री, दिपक शास्त्री, अनंत गावकर, धाकलू दळवी, दत्तू कदम, दत्तू कालेकर, नारायण भातकांडे, रामू कदम, नारायण राणे आदी उपस्थित होते.






Leave a Reply