परराज्यात विक्री केल्याचा संशय; लोंढा रामनगर -पोलीस हद्दीतील घटना, स्थानिक आणि बाहेरील एजंट यासाठी कार्यरत….
लोंढा: लोकहित न्यूज (क्राईम)
खानापूर आणि जोयडा या लगतच्या तालुक्यांच्या सीमेवरील लोंढा -रामनगर परिसरातील 9 अल्पवयीन मुली अचानक गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यांची बाहेरील राज्यात विक्री केल्याचा संशय बळावला आहे. असे कृत्य करण्यासाठी गोवा आणि स्थानिक एजंट यासाठी कार्यरत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. रामनगर शाळेला येणाऱ्या या मुली अचानक यायच्या बंद झाल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे, अद्याप या घटनेची नोंद लोंढा- रामनगर पोलीस स्थानकात झाली नसली तरी, एजंटांच्या भूलथापांना सदर मुलींचे पालकही बळी पडल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणाचा छडा लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोव्याहून कोलकत्त्याला मुलींना पाठवक्याचा संशय?…
रामनगर आणि लोंढा येथून विक्री केलेल्या अल्पवयीन मुलींना पहिल्यांदा गोव्याला नेण्यात आले, त्यांनतर अधीक मानधन मिळणार असल्याचे सांगत, त्यांना कोलकत्याला नेण्यात आले असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या मुली वाममार्गाला वापरल्या जाणार असल्याचा अधिक संशय आहे. मुलींच्या पालकांना एजंटाकडून भुलथाप घालून, मुलींना नेण्याह येते. तुमच्या मुली शाळा शिकून कोणत्या नोकरीला लागणार ? त्यापेक्षा आताच पाठवा आमच्याकडे चांगली चांगली कामे आहेत, तेथे पाठवू या, अशा मोठ्या मोठ्या भूलथापा हे एजंट घालत आहेत. मुलींची विक्री केल्याच्या बदल्यात मधल्या एजंटांना 12 हजार मिळतात अशीही माहिती हाती लागली आहे. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी चक्क मानवी तस्करी? , त्यामुळे बालकल्याण खाते आणि पोलिसांनी या घटनेचाशोध घेण्याची गरज आहे, अन्यथा मोठं अनर्थ होण्याची भीती आहे.
असे प्रकार घडले तर मुली कशा राहणार सुरक्षित?…
विशेष करून ग्रामीण भागातच धक्कादायक प्रकार वारंवार घडत असतात, सामान्य नागरिक आणि त्यात पोटासाठी धडपडणारे अशा लोकांना मोठ मोठ्या थापा मारून पैशांची अमिषे दाखवण्यात येतात, आधीच गरिबी त्यामुळे पालकही त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे बालकल्याण खाते आणि पोलिसांनी याचा तत्काळ शोध घेण्याची नितांत गरज आहे…






Leave a Reply