जांबोटी ‘लीग’चा गेल्या वर्षीचा विजेता ; यंदा एसएन पोल्ट्री संघाकडून पराभूत….


एसएन पोल्ट्री संघ ठरला जांबोटी विभाग लीगचा प्रथम मानकरी: आमगाव संघ दुसरा विजेता..….

जांबोटी: विलास कवठणकर ( लोकहित न्यूज)

      गेल्यावर्षी जांबोटी विभाग लीगचा विजेता ठरलेला आमगाव शिवांस संघ यंदा नागुर्डा एसएन पोल्ट्रीकडून यंदा पराभूत झाला आहे. अति अति तटीचा हा सामना शेवटपर्यंत गाजला होता, आमगावचा अष्टपैलू खेळाडू ज्ञानेश्वर गावडे ( बेटणे) हा षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावचीत झाला अन् तिथेच सामना नागुर्डा संघाच्या बाजूने झुकला. त्यामुळे गेल्या वर्षीचा विजेता आमगाव संघ यंदा एसएन पोल्ट्री संघाकडून पराभूत झाला. याआधी सकाळी एसएन पोल्ट्री संघ नागुर्डा आणि प्रणाली स्ट्रायकर्स यांच्यात झाला, त्यातून नागुर्डा संघ फायनल मध्ये पोहचला. तर दुसरा सामना तोराळी आणि आमगाव यांच्यात एक इनिंगचा सामना झाला खरा पण, थोड्याशा गोंधळामुळे हा सामना पुरा होवू शकला नाही. त्यामुळे हा सामना रद्द जांबोटी ‘लीग’ कडून रद्द ठरवून आमगावला विजयी  घोषित करण्यात आले. यावेळी गेल्या वर्षी पहिला तर यंदा दुसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरत आमगाव संघाने विजयी परंपरा कायम राखली आहे..

पहिल्या संघाला 1लाख 1 हजार 111 तर दुसऱ्याला 55, हजार 555 रूपये पारितोषिक देण्यात आले…

जांबोटी विभाग क्रिकेट लीगकडून उत्तम नियोजन….

      गतवर्षीप्रमाणे यंदाही जांबोटी विभाग लीग कडून उत्तम नियोजन करण्यात आले होते. शेवटच्या सामन्यामध्ये युटूब वरून थेट प्रक्षेपणची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सामन्याचा निकाल देण्यास सोपे गेले. त्यामुळे सर्व संघांकडून लीगच्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *