प्रेमाच्या गावी जातांना; जुनी नाती उमगतांना….


व्हॅलेंटाईन डे स्पेशल निमित्ताने आठवतात जुन्या आठवणी; पण, आज मनाचा प्रेमभाव आहे का?…

   

लोकहित न्यूज: विलास कवठणकर ( व्हॅलेन्टाईन डे विशेष)

       जावे प्रेमाच्या गावी आठवाव्या जुन्या आठवणी! जितक प्रेम जुनं तितकी नाती घट्ट, पण प्रेमात अखंड बुडालेले या भानगडीत न पडण्याचा सल्ला देतात. तरीही प्रेमाच्या दुनियेत डोकावून पाहण्याची आशा बळावते का? अस वाटत बर! त्याबद्दल लोकहित न्यूज ने घेतलेला हा आढावा….

काय सांगतो आतापर्यंतचा अनुभव….

मनुष्य प्राणी हा आशावादी आहे, आपल्याला जे हवं ते भेटलं की, तो आनंदी, सुखी समाधानाची भावना जागवतो. आजकाल आपण जिथे राहतो ती शहर वाईट असतात ही भावना बळावली आहे, गावच्या परिसरात रस्त्यावर एकदा खून झाला झाला तर कोणीही सदर खून होतांना खून करणाऱ्याला अडवत नाही, खून झाल्यानंतर काही वेळा खून झालेला व्यक्ती वेळेत दवाखान्यात दाखल केल्यानंतर जगण्याचे चान्स असते तरीही तशा व्यक्तीला कोणी हात लावायला पुढे येत नाही, शिवाय पोलिस चौकशीसाठी आल्यास माहिती असूनही कोणी सांगण्यास पुढे येत नाही. तेच एखादे प्रेम युगुल रस्त्यावर बोलत थांबले असता, खुनाच्यावेळी अखुडलेले तेच हात प्रेमयुगुलांना धमकावण्यास मात्र, ताठ उभे राहून पुढे येतात. ही आजच्या समाजाची वृत्ती. या दोन घटना ! एक घटना मरणाच्या दारात असणाऱ्याला वाचवणं असतं त्यावेळी मागे सरकणे आणि तेच एक नाते खुलंत असतांना मात्र, पुढे यायचे. या दोन्हीं घटना आजच्या समाजाची रीत स्पष्ट करतात.

प्लीज मला समजून घे ना…

        प्रेमाच्या दुनियेत प्लीज मला समजून घे ना, तू समजुतदार आहेस, समजून घेशील, तुला काही समजतच नाही बघ! अशी प्रेमाची भाषा विशेष ऐकू येते. इथे प्रश्न विचारणं गुन्हा आहे, त्याचे स्पष्टीकरण देताना गुंतागुंत वाढवण आणि गप्प बसणं यातच शहाणपण आहे! प्रेमाच्या गावचे प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे ‘संशय चौक ‘ याच चौकात निखळ प्रेमाच्या आणाभाका आणि एकमेकावर संशयही घेतला जातो. सुवातीला प्रेमाच्या गावातील लोक खूप प्रेमळ असतात मात्र, काही कालांतराने ते बदलतात , वर आणि म्हणतात मी फुलापासूनच असा/अशीच आहे. मध्येच एक ओव्हर थिंकिंग नावाचा खडा येतो, त्या कड्यावरून जीवन संपणारे भेटतात. गोल गोल रस्त्यांप्रमाणे हेही गोल गोल फिरतात, त्यांना वाटते की, मी पुढे चालत आहे. पण, बोका कसा स्वतःचीच शेपडी धरून स्वतः भोवती फिरतो ना! तशीच अवस्था यावेळी व्यक्तीचीही होऊन बसते.

गैरसमज नावाचे हॉटेल आणि भांडण वस्तुसंग्रहालय…

   गैरसमज नावाचे ‘हॉटेल’ लागते ते हॉटेल 24 तास सुरू राहते. तर गावच्या पश्चिम दिशेला ‘भांडण’ नावाचे वस्तू संग्रहालय येते, त्यात जुन्या चुका केलेली वाक्ये शेंड्या बुडका मोडून ठेवलेली असतात. प्रेमाच्या गावातून परतीचा मार्ग तितका सोपा नसतो त्यामुळे काही केल्या तो सापडतच नाही. तत्पूर्वी प्रेमाच्या गवत शिरतांना माझं’पिल्लू ‘असत, ब्रेकअप नंतर मात्र, ते एकदमच  ‘जारे कुत्र्या’ अस होऊन बसत! आणि तेंव्हा मात्र तो आणि तीही प्रेमाच्या गावातून बाहेर पडून पूर्णपणे परिपक्व होतात. त्यातून त्याला एकच अनुभव येतो, जावे प्रेमाच्या गावी पण वस्तीला नको बाबा! एवढंच…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *