समर्थ न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
ध्येय उराशी बाळगून धाडसाने सामोरे गेल्यास यश तुमच्या पायाशी लोटांगण घालील, असा प्रयत्न करा. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना परीक्षेची कोणतीही भीती नसते, ते बिनधास्त असतात. असेच सर्वांनी बिन्धास्त अभ्यासात रमावे तुम्ही नकीच गुण संपन्न व्हाल असा विश्वास अँड. सुभाष देशपांडे यांनी व्यक्त करणे. खानापूर येथील समर्थ न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एफ. एम. पाटील होते. व्यासपीठावर सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा, खजिनदार डॉ.पी.एन पाटील, डॉ. एन. एल कदम, नागराज गडदार आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. डी. ई नाडगौडा यांनी स्वागत केले. यावेळी ग्रुप ॲडमिन दिव्या नाडगौडा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल व फोटो पूजन करण्यात आले. यावेळी दहावीच्या विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले तर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थांनी मनोरंजपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य बाळकृष्ण हलगेकर यांनी आभार मानले..






Leave a Reply