आज सकाळी 11 वाजता जांबोटी नाका या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्धघाटनासाठी आमदार विठ्ठल हलगेकर, मा.आ. अरविंद पाटील यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…
विलास कवठणकर: लोकहित न्यूज ( जांबोटी)
जांबोटी भागासह तालुका आणि जिल्ह्यात उत्सुकता लागलेल्या ‘जांबोटी क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वाची आजपासून ( 14- नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. आज सकाळी 11 वाजता जांबोटी नाक्याजवळ असलेल्या भव्य मैदानावर लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, एमडी सदानंद पाटील,माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, लक्ष्मण बामणे, जांबोटी विभाग भाजप अध्यक्ष लक्ष्मण झांजरे, भाजप युवा मोर्चा सचिव पंडीत ओगले, अरुण महाराज कणगुटकर, माजी केडीपी सदस्य प्रकाश पाटील, जय हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत, एमडी सदानंद पाटील, मारूती पाटील यांच्यासह तालुका आणि जांबोटी भागातील आजी माजी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी ‘क्रिकेट लीग’ चे अध्यक्ष युवा नेते सचिन साबळे असतील, तर जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर आणि ओलमणी शाहू हायस्कूलचे सहशिक्षक अजित सावंत यांनी प्रमूख वक्ते म्हणून उपस्थिती दर्शविणार आहेत.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप युवा नेते अनंत सावंत करतील तर पाहुण्यांचे स्वागताध्यक्ष म्हणून लीगचे खजिनदार युवा नेते दौलतराव कोलीकर आणि लीगचे उपाध्यक्ष व्यंकट पाटील यांची निवड करण्यात आली आहे..
स्पर्धेतील विजेत्यांना भव्य बक्षिसे …
जांबोटी भागातीलच ही मोठी क्रिकेट लीग असून, या स्पर्धेतील विजेत्यांना 1लाख एक हजार 111 पहिले बक्षिस तर द्वितीय विजेत्यास 55 हजार 555 या सांघिक बक्षिसासह वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतील. आठ दिवस ही स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेमध्ये एकूण 17 संघ सहभागी होणार आहेत . या संघाची निवड श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर झालेल्या जांबोटी क्रिकेट लीगच्या लिलाव कार्यक्रमांमध्ये संघमालकांनी आपापल्या खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे प्रत्येक संघात एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू असल्यामुळे कोण सरस ठरणार आणि कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता भागातील क्रिकेटप्रेमींना लागून आहे..






Leave a Reply