गोवा आझाद मैदानावर युथ काँग्रेसचे राज्य सरकार विरोधात आंदोलन; आंदोलकांना मुखमंत्र्यांना भेटण्यास पोलिसांकडून मज्जाव…
पणजी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
जब जब सीएम डरता हैं, पोलिस को आगे करता है! या घोषणा आहेत, गोवा येथील आझाद मैदानावरील राज्य युथ काँग्रेसच्या आंदोलकांच्या! आज राज्य युथ काँग्रेसच्यावतीने येथील आझाद मैदानावर राज्य भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले होते. यावेळी वरील घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अलीकडच्या काळात राज्यात वाढलेल्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेकायदेशीर धंद्यांवर नियंत्रण आणण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणाऱ्या सरकारला जनतेने उकडून टाकावे असे आवाहन करत, सरकार विरोधात राज्य काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहील अशी माहिती आय आयसीसी काँग्रेस सचिव तथा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना दिली.
आंदोलकांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यास पोलिसांकडून मज्जाव…
राज्यात वाढलेली गुन्हेगारी, अवैध धंदे, भ्रष्टाचार , विशेषकरुन महिलांचे संरक्षण करण्यास राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप करत राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार, बलात्कारसारख्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थिनी, महिला सुरक्षित नसून, भीतीखाली सापडल्या असल्याचा आरोप राज्य युथ काँग्रेसच्यावतीने यावेळी करण्यात आला. या सर्व समस्यांवर शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडत, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलीसबळाचा वापर करत भेटण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांना पोलिसवाहनात घालून अटक करून सुटका करण्यात आली.
राज्य सरकारकडून सामन्यांच्या हक्कांवर गदा: गिरीश चोडणकर..
राज्य सरकारकडून सामन्यांच्या हक्कांवर गदा आणण्यात येत असून, लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप माजीं गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, हे सरकार लोकशाही मार्गाने चालत नसून, हुकुमशाहीने चालत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे रक्षण होत नसून, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर अंकुश ठेवण्याचे सोडून, गुन्हेगारी प्रवृत्तीला हे सरकार पोसत असल्याचेही ते म्हणाले.
सामान्य नागरिक, वृद्ध आणि महिलांवर अन्याय करा असा वरून आदेश: अखिल भारतीय काँग्रेस सचिव तथा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर…
सामान्य नागरिक, वृद्ध आणि महिलांवर जाणीवपूर्क अन्याय अत्याचार करा असा वरून आदेश आल्याची जोरदार टीका अखिल भारतीय काँग्रेस सचिव तथा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी यावेळी केली. आम्हीं विरोधी पक्ष म्हणून शांततेत आंदोलन छेडत मुख्यमंत्र्यांना भेटण्यास पोलिसबळाचा वापर करत मज्जाव करण्यात आला. मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागते म्हणुन पोलिसांना पुढे करत असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी यावेळी राज्य युथ काँग्रेसचे अध्यक्ष उदयभान, युथ काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…







Leave a Reply