मा.आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना पोलिसांनी दाखवली ‘खाकी ‘


पोलीस स्थानकात काढावी लागली रात्र; विधान परिषद सदस्य चन्नाराज हट्टीहोळी यांच्या ग्रुपवर वापरले अपशब्द

 

खानापूर: लोकहित न्यूज

     एकेकाळी माजी आ. निंबाळकर यांच्याच तालमीत तयार झालेले कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या आणि अलीकडेच मंत्री हेब्बाळकर आणि चनराज हट्टीहोळी यांच्या गटात कार्यरत असणाऱ्या दोघांना माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणे चांगलेच महागात पडले आहे. दुर्गेश तलवार ( रा.जांबोटी)आणि संतोष पाटील ( रा.लोकोळी) असे सदर दोघांचे नाव आहे.  त्यांनी दोघांनी विधान परिषद सदस्य चनरान हट्टीहोळी यांच्या समर्थकांच्या व्हाट्सअप ग्रूपवर डॉ. निंबाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी खाकी दाखवल्याने संपूर्ण रात्र पोलिस कोठडीत काढावी लागली . या घटनेने इतरांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत.

….अपशब्द स्वतःहून की, राजकीय?

       या घटनेबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असून, त्या दोघांनी वापरलेले अपशब्द स्वतःचे की, यामागे कोणी राजकीय व्यक्ती आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात विशेष म्हणजे स्वतः विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी यांनी या ग्रुपवर असताना त्यांनीही यावर आवर का घातला नाहीं? असा सवाल माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *