राम जन्मोत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; कीर्तन, 1 ते 3 महाप्रसाद, 4 ते रात्री 9 पर्यंत गावात श्रींच्या पालखी सोहळा…
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
जांबोटी पश्चिम भागात मोठा सोहळा म्हणून ओळख असणाऱ्या जांबोटी रामापूरपेठेतील श्री राम जन्मोत्सव गुरवारी ( दि.26 ) रोजी साजरा होत आहे. यानिमित विविध धार्मिक कार्यक्रम , पालखी सोहळा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील तसेच भागातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीकडून करण्यात येत आहे..

कार्यक्रमांची रूपरेषा अशी….
सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील, 10 ते 12 यावेळेत गोव्यातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह .भ. प गणेशबुवा यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी 1 ते 3 यावेळेत महाप्रसाद, 4 ते 9 यावेळेत गावातून पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार असून, रात्री कारलगा येथील संत एकनाथ महाराज सोंगी भारुड होणार असून, याचे उद्घघाटन तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर रायप्पा कुडतुरकर यांनी असतील, सुनील डांगे, राहुल जांबोटकर, अर्जून पेडणेकर, ओंकार कोटीभास्कर, संतोष नाईक, हणमंत पेडणेकर, मिलिंद कोटीभास्कर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर विनोद पाटील, महादेव साखळकर, उज्वल हळदणकर, विकास वेताळ व भीमराव कुडतरकर यांच्याहस्ते विविध देवतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी गावातील काहीं मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे…
हनुमान जयंतीचेही नियोजन…..
जांबोटीत दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाचेही यावेळी नियोजन करण्यात आले असून, गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हा कार्यक्रम पार पडेल असे या पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे….






Leave a Reply