नागरिकांतून समाधान; अशीच स्वच्छता मोहीम इतर ठिकाणीही घ्यावी हाती…
जांबोटी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
म्हणतात ना एक बातमी संपुर्ण व्यवस्था बदलेल ! त्याप्रमाणे मंगळवारी ( दि. 20) लोकहित न्यूज ने जांबोटी पंचायतीचा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जांबोटी पंचायतीने जांबोटी रामापूर पेठेतील सदर अंगणवाडीसमोरील गटारीची तत्काळ स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे स्वच्छतेची समस्या तुर्तास तरी दूर होणार आहे. पंचायतीला जागे केल्याबद्दल लोकहित न्यूजचे नागरिकांतून आभार मानले जात आहेत. शिवाय ग्राम पंचायतीने इतर ठिकाणीचीही स्वच्छता मोहीम हाती घेऊन संपूर्ण पंचायत क्षेत्र दुर्गंधीमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आज सायंकाळच्या सुमारास पंचायतीकडून दखल…
आज सायंकाळच्या सुमारास ग्राम पंचायतचे सचिव नारायण पाटील यांनी पंचायतीचे कर्मचारी लावून जांबोटी पेठमधील अंगणवाडी समोरील गटारी स्वच्छता करून घेतल्या. यासाठी निधी राखीव ठेवला होता. पण, तो अद्याप खर्च करण्यात आला नसल्याचेही पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले. सध्याच्या घडीला पीडीओकडून निधी आला नसल्याचे सांगण्यात येत असल्याचेही ते म्हणाले…
प्रतिक्रिया
लोकहित न्यूजच्या वृत्तानुसार आम्हीं प्रत्यक्ष पाहणी करून आजची ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे, त्यानुसार सर्वच ठिकाणची स्वच्छता व समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल. नागरिकांनीही आपल्या घरासमोरील गटारी व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन आम्हीं लोकहित न्यूजच्या माध्यमातून करत आहोत..
–नारायण पाटील, जांबोटी,पंचायत सेक्रेटरी…







Leave a Reply