‘कर्नाटकी’ राज्योत्सवाच्या धिंगाण्यात फिल्मी स्टाईलने ‘चाकू हल्ला ‘ दोघांची प्रकृती चिंताजनक….


सहा जण गंभीर अवस्थेत; मराठी भाषिकांना डीवचन्याच्या नादात अती उत्साहीपणा नडला

बेळगांव: विलास कवठणकर ( लोकहित न्यूज)

      निव्वळ आणि निव्वळ बेळगांव सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी जनतेच्या मालकीचे लाखों रुपये उधळून राज्योत्वाच्या नावावर नंगा नाच करणाऱ्या भाडोत्री कन्नड गुंडांना चांगलीच चपराक बसली आहे. सदाशिवनगरात राज्योत्वाची मिरवणूक येताच फिल्मी स्टाईलने चालू हल्ल्याचा हल्ला झाला, त्यात सहा जण जखमी झाले असून , त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेने राज्योत्सवाला गालबोट लागले आहे. तेच शांततेच्या मार्गाने केंद्र सरकारच्या विरोधात काळा दिन म्हणून सायकल फेरी काढणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात कुणालाही साधी इजासुद्धा पोहचली नाही, हाच या दोन्हीं घटनाधील फरक आहे.

 

 .. चाकू हल्यात सहा जण जायबंदी; जखमींना दवाखान्यात दाखल

     सदाशिवनगरात मिरवणुकीत झालेल्या चाकू हल्यात सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी व सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. गुरुनाथ वक्कूट, सचिन कांबळे, विनायक आणि नझिर पठाण अशी जखमींची नावे आहेत. येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ मिरवणूक येताच काहीं जण चाकू आणि जांबिया घेवून गर्दीत घुसले आणि हल्ला चढवीला. त्यात एकूण सहा जण जायबंदी झाले असून, दोघे चिंताजनक परिस्थितीत आहेत.

यासाठी 50 लाखाची सरकारी उधळपट्टी, मराठी गाण्यांवर नंगानाच, महाराष्ट्रातील डॉल्बीची मदत…

         मराठीला डीवचन्यासाठी मुद्दामहून बेळगांवातच बेकायदेशीर जोरदार डॉल्बीवर नंगानाच अगोदरच्या रात्रीपासूनच सुरू होता, त्याला राज्योत्वाच्या दिवशी असा जोर आला होता की, लगतच्या बिल्डिंगमधील भिंतीना हादरा बसत होता. त्यावरून कळते की, किती मोठा हा दणदणाट होता. यात कमालीची गोष्ट म्हणजे, मराठीला विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात राज्योत्सव मिरवणुकीत मराठी गाण्यांवर नंगानाच करण्यात आला, यावेळी मराठी आठवली नाही का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे मराठी गाणी हवी, मराठी भाषिक नको! हा कोणता न्याय असा अजब सवाल मराठी भाषिकातून विचारला जात आहे  . त्यात डॉल्बीही महाराष्ट्रातून आणण्यात आली होती, तर या सर्व नंगानाचासाठी 50 लाखाची सरकारी उधळपट्टी करण्यात आली आहे, ती कोणी नेता आपल्या खिशातून देणार नाही तर ती जनतेकडून वसूल केली जाणार हे सर्व भाषिकांनी लक्षात ठेवले पाहिजेत. बाहेरील कन्नडडीगांनी बेळगावात येवून धुडगूस घालून पलायन केले, त्यात स्थानिक कन्नड भाषिकांच्या अति अल्प प्रतिसाद होता. त्यामुळे हा इतका अट्टाहास कशासाठी? मजा करण्यासाठी का? … तेही सरकारी पैशावर…

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *