जांबोटी कृषी पत्तीनवर अरविंद पाटलांचे निर्विवाद वर्चस्व….


12 पैकी 7 उमेदवार विजयी; धनश्री सरदेसाई गटाचे 5 उमेदवार विजयी….

   

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

          चापगावनंतर जांबोटीतही सत्ता काबीज करण्यास माजी आमदार तथा डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांना यश आले आहे. एकूण 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 7 उमेदवार विजयी झाले असून, पाटील आणि त्यांच्या शिलेदारांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर जांबोटी कृषी पत्तीनच्या माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी 5 उमेदवार निवडून आणले आहेत.

विजयी उमेदवार असे…

        अरविंद पाटील पॅनेल –  बिनकर्जदारमध्ये किरण साबळे (ओलमणी), विजयी, जांबोटी पेठेतून मंजुनाथ डांगे, ओलमणीतून जोतिबा नावलकर, कापोली सहदेव पाटील, वडगावमधून जयवंत देसाई, शिवाजी गुरव, प्रभावती श. पाटील तर धनश्री सरदेसाई गटातून सुधाकर गावडे (जंबोटी),  चंद्रकांत देसाई जाबोटीवाडा), भाऊ कुर्लेकर जांबोटीपेठ, दुर्गाप्पा तळवार (जांबोटी) व शांता शांताराम गावडे यांनी विजयी झाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *