गावफोड्यांपासून ‘सावध’ रहा हं!: एमडी सदानंद पाटील….


ओलमणीत पांडुरंग हरिनाम सप्ताहाची सांगता; यावेळी जाहीर सभेत आवाहन…

ओलमणी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

    गेल्या तीस वर्षांपूर्वी विशेषकरून ग्राम भागामध्ये एकोपा असायचा पण, आजकालच्या वेगवेगळ्या पक्षीय आणि संघटनात्मक राजकारणामुळे हा एकोपा नाहीसा झाल्याचे दिसते आहे. त्यावरूनच एक वक्तव्य केले आहे ते लैला शुगर्स ( महालक्ष्मी ग्रुप) चे एमडी सदानंद पाटील यांनी. ते म्हणाले गावात कोणही येईल गावचे दोन तुकडे करील आणि आपली राजकीय पोळी भाजून घेईल, अशा लोकांपासून सावध रहा असे आवाहन त्यांनी नुकतेच पार पडलेल्या ओलमणी ( ता. खानापूर) येथील सात दिवसांच्या पांडुरंग हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. त्यावेळी आयोजित केलेल्या नाटका पूर्वीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, जांबोटी ग्रा. पं. उपाध्यक्ष सुनिल पाटील, जांबोटी कृषी पत्तीनचे संचालक जयवंत देसाई, विश्वनाथ डिचोलकर, ॲड. दिनकर राऊत, नागेश कांबळे, तरुण भारतचे जांबोटी प्रतिनिधी हणमंत जगताप, जोतिबा नावलकर, शाहु हायस्कूलचे सहशिक्षक अजित सावंत, सागर दळवी यांच्यासह सर्व आमंत्रित मान्यवर उपस्थित होते. तुकाराम ह. साबळे यांनी स्वागत केले.

पुढे, काय म्हणाले एमडी- गावात कोण येतील गावचे तीन तुकडे करतील आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतील, अशा लोकांपासून सावध राहून, कोण विकास करतय याची पारख करा आणि त्यांनाच साथ द्या असे आवाहन करतानाच, त्यांनी कोणत्या राजकारण्यावरून हे वक्तव्य केले याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावेळी ते म्हणाले की, आपला खानापूरचा साखर कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू असून, ओलमणी भागातील ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात झाली आहे, ऊसाचे उत्पादन कसे? वाढवावे हेही सांगताना त्यांनी यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या सवलतींचीही माहिती दिली.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *