चौघांवर संशय असल्याची स्थानिकांची माहिती; पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा छडा लावून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी…
जांबोटी: लोकहित न्यूज ..
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समानतेचे प्रतीक म्हणून निळ्या रंगाच्या ध्वजाचा स्वीकार केला होता. त्यामुळे त्यादिवसापासून सामान्य नागरिक आणि बहुजनांसाठी ही घटना अभिमानास्पद मानली जाते. हा ध्वज म्हणजे सर्व जाती, धर्म, भाषांचे प्रतीक मानले जाते. पण, सोमवारी रात्री अज्ञातांनी जांबोटी बस स्थानकावर शिव स्मारकासमोर असलेल्या निळ्या रंगाच्या ध्वजाची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भीम आर्मीच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी जांबोटी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांचा चौघांवर संशय असून, पोलिसांनी त्यांचा तत्काळ शोध घेवून कठोर कारवाई करावी, अन्यथा भीम अर्मीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे.
जांबोटी पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून अज्ञातांचा शोध सुरू आहे, जिल्हा भीम आर्मीचे प्रधान सचिव नागेश कांबळे, जांबोटी भीम आर्मीचे अध्यक्ष राजू कुर्लेकर यांच्या माहितीनुसार झेंडा काढून नेण्यात आला असून, त्याची काठी जवळच टाकण्यात आली आहे. हे कोण्या मनुवादी विचाराच्या व्यक्तींकडून कृत झाले असावे का? अशी शंका व्यक्त करतात येत आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केले असेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीकडून होत आहे. लागलीच ग्राम पंचायत आणि पोलिसांनी पुन्हा त्याच ठिकाणी डौलाने झेंडा उभा करून देण्याची हमी दिली असून, तशी तयारीही सुरू केल्याची माहिती राजू कुर्लेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. जांबोटी आउटपोस्टचे सहायक पोलिस उपनिरीक्षक बाहुबली व त्यांचे सहकारी या प्रकणाचा तपास करत आहेत.







Leave a Reply