खानापूर को ऑपरेटिव्ह बँकेची उंच भरारी ; सभासदांसाठी येणार चांगले दिवस; ‘अ’ वर्ग सभासदांना 15 तर, ‘ब’ वर्ग सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याची शिफारस: अमृत शेलार…

खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर तालुक्यात जुनी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर को – ऑफरेटिव्ह बँकेने उंच भरारी घेतली असून असून, सभासदांसाठी चांगले दिवस येणार आहेत. 99 लाख 23 हजार 823 रुपयाचा नफा झाला असून, त्यातील विभागणीतून ‘अ’ वर्ग सभासदांना 15 लाभांश तर ‘ब’ वर्ग सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे, ती लवकरच मंजूर होणार असून,सभासदांसाठी चांगले येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अमृत शेलार यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.
गतवर्षीच्या 13 लाख 63 हजार 284 च्या तुलनेत तब्बल सात पट्टीने वाढ होत शंभर कोटींच्या घरात पोहोचल्याची माहिती अध्यक्ष शेलार यांनी पुढे बोलतांना दिली.
सोमवारी (दि.21) रोजी बँकेची 104 वी वार्षिक सर्वसाधारण सभा…
सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी खानापूर – जांबोटी रोडवरील शुभम गार्डन हॉलमध्ये बँकेची 104 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार असून, सर्व सभासद हितचिंतकांनी सकाळी 11.30 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अमृत शेलार यांनी लोकहित न्यूज च्या माध्यमातून केले आहे.
बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा…
वर्षभरात ठेवींंमध्ये मोठी वाढ झाली असून, 100 कोटींच्या घरात ठेवी पोहचल्या आहेत. 88 कोटी 3 लाख लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून, त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. 32 कोटी 58 लाख बँकेची गुंतवणूक असून, 64 कोटी 34 लाखांचे कर्ज वाटप बँकेने केले आहे. बँकेचे खेळते भांडवल 2 कोटींच्या घरात पोहचले असून,111 कोटी 97 लाखांवर जाऊन पोहोचले आहे.
खानापूर मुख्य शाखेसह नंदगड, टिळकवाडी, बिडी, काकातीवेश (बेळगाव) शाखांचीही उत्तम कामगिरी!
खानापूर येथील बँकेच्या मुख्य शाखेसह नंदगड,टिळकवाडी बिडी, काकातीवेश ( बेळगाव) बँकेच्या शाखांनीही चांगली कामगिरी साधली असून, नागरिकांचा व्यवहार पाहता तेथूनही आर्थिक ‘रेव्हेन्यू’ वाढला आहे, अशा उत्तम कामगिरीबद्दल सभासदवर्ग आणि नागरिकांतून बँकेचे कौतुक केले जात आहे.
