राजवाडा (जांबोटी) चौकांबा गल्लीत पंधरा दिवस पाणीच नाही!


माजी ग्रा. पं. सदस्य शंकर सडेकर यांची माहिती: काय करते पंचायत? बोअरवेल असून खोळंबा, उघड्या बटण बोर्डामुळे  कोणाचा तरी जीव जाण्याची भीती….

   

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     

         पाच वर्षात पाच पीडिओ होवूनही जांबोटी गावातील समस्या सुटणे कठीण झाले आहे, जांबोटी राजवाडा येथील चौकांबा गल्लीत गेल्या  पंधरा दिवसांपासून पाणीच नसल्याची माहिती माजी ग्राम पंचायत सदस्य शंकर सडेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. या गल्लीत बोअरवेल असूनही पाणी का? नाही असा संतप्त सवाल महिलांनी पंचायतीला केला आहे. पाण्यासाठी लाखोंचा निधी खर्च म्हणून दाखवला जातोय तर मग ही अशी अवस्था का? असाही प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. याबाबत पंचायत पीडिओ यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचेही शंकर सडेकर यांनी सांगितले.

बोअरवेल बटन बोर्ड म्हणजे मृत्यूचा जणू सापळाच?

     येथील बोअरवेल बटन बोर्ड म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. बटन बोर्डातील वायरिंग, फ्यूज खोल्या असून, सदर बटण बोर्डाला एक दरवाजाही नाही, त्यामुळे हा बोर्ड म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. पंधरावा आयोग आणि निधी-2 मधून लाखोंचा खर्च विद्युत आणि पाणी बिलासाठी दाखवला जातोय, तर मग ही अवस्था अशी का? याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी शंकर सडेकर यांनी केली आहे.

सोसियल मीडियावर वडगांव वार्डातील कामांची जोर चर्चा…

     जांबोटी पंचायत क्षेत्रातील  आणि सध्याचे पंचायतीचे उपाध्यक्ष सुनिल देसाई यांच्या वडगाव वार्डातील विकास कामांची चर्चा जांबोटी (खानापूर) जनसंपर्क व्हॉटसअप ग्रुपवर जोरदार रंगली होती. कोणाच्या घराबद्दल, कोणाच्या गोठ्याबद्दल शिवाय निधीबाबत चॅटिंग सुरु होते, त्यावर खुद्द उपाध्यक्ष आणि वॉर्ड सदस्य सुनिल देसाई यांनी उत्तर दिले. आता त्यांचा विषय कितपत योग्य अयोग्य आहे हे तपासाअंतीच कळेल….

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *