कलाश्रीच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित अधिक बुके वाटप केल्याबद्दल ज्ञानेश्वर सो. संचालक मंडळाचे कलाश्रीचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांच्याकडून भेट घेऊन अभिनंदन…
किणये: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यभर व्यापत चाललेल्या कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. त्यानिमित वर्धापन दिनाची बुके मोठ्या प्रमाणात वाटपाचे काम सुरू आहे. किणये (ता. बेळगांव) येथील श्री ज्ञानेश्वर सोसायटी संचालक मंडळाकडून मोठ्या संख्येने कलाश्रीची बुके वाटप करण्यात आली, त्यामुळे कलाश्रीला मोठे बळ मिळाले आहे, असे सांगत ज्ञानेश्वर सोसायटीचे अध्यक्ष सुरेश डुकरे, त्यांचे सर्व संचालक व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन अभिनंदन केल्याची माहिती कलाश्रीचे चेअरमन प्रकाश डोळेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.






Leave a Reply