वन आणि माणसांचे मन ओळखणारे वनअधिकारी म्हणजेच एस.एस निंगाणी: विलास बेळगावकर…


मुख्यमंत्री पदक विजेते  रेंजर शिवानंद निंगाणी यांचा खानापुरात स्वागत समारंभ; तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती

खानापूर: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

      खानापुरात वन अर्थात जंगल आणि त्याचे महत्व काय व जंगल आणि मानव यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे खानापूर तालुक्यात रेंजर म्हणून उत्तम सेवा बजावत संपूर्ण तालुक्याला आपलेसे करणारे अधिकारी म्हणजे एस. एस निंगाणी यांनी होत. वनाचे महत्व आणि त्याच बरोबर माणसांचे मन एकाचवेळी ओळखणारे वनाधिकारी म्हणूनही त्यांना खानापूर तालुक्यातील जनता मानते असे मत, जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक- अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी मांडले. रविवारी ( दि.11) एस.एस निंगाणी यांचे पुत्र रेंजर शिवानंद निंगाणी यांना नुकतेच मुख्यमंत्रीपदक देऊन गौरवण्यात आले, त्यानिमित्त मराठा  मित्र मंडळ आणि तालुकासियांच्या वतीने शिवानंद निंगाणी यांचा शनय्य गार्डन हॉलमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. बेळगावकर बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमानी, सहपत्नीक एसीएफ एस.एस निंगाणी, नारायण कापोलकर, वार्ताहर पिराजी कुऱ्हाडे, ईश्वर बोबाटे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

रेंजर शिवानंद निंगाणी यांचे स्वागत करतांना खानापूरवासिय…

        यावेळी पुढे बोलतांना विलास बेळगावकर म्हणाले की, एस.एस निंगाणी यानी आमच्या तालुक्यात उत्तम सेवा बजावली असून, तालुक्यातील नागरिकांशी चांगला सलोखा राखला आहे, म्हणूनच ते सर्वांच्या ओळखीचे राहिले आहेत. तालुक्यातील वन आणि माणसांचे मन जपण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळेच ते अधिकारी म्हणून कमी आणि चांगले व्यक्ती म्हणुन अधिक तालुकाभर परिचीत असल्याचेही ते म्हणाले.

रेंजर शिवानंद निंगाणी म्हणाले की, खानापूर तालुक्याच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोहोचलो, खानापूरच्या नागरिकांनी मला खूप प्रेम दिले आहे, त्यामुळे मी त्यांचा ऋणी असल्याचेही ते म्हणाले.

वन तिथे निंगाणी: एस.एस निंगाणी – जिथे वन तिथे निंगाणी असे ब्रीदवाक्य देत, माझ्या मुलग्याच्या यशामागे संपूर्ण खानापूर तालुक्याचे अफाट प्रेम लाभल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.

उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव…

     यावेळी बोलतांना उपस्थित सर्व मान्यवरांनी एस. एस निंगाणी, शिवानंद निंगाणी व त्यांच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *