खानापूर च्या ग्रामीण भागात सात दिवस चालतात लोकोत्सव…
खानापूर: लोकहित न्यूज
आजपासून होळी पौर्णिमा उत्सवाला सर्वत्र प्रारंभ झाला असून, आज काहीं ठिकाणीं होळीचे दहन केले जाते तर विशेषकरुन ग्रामीण भागांतील बहुतेक गावात उंच होळी उभी केली जाते. तर काहीं ठिकाणीं पाच काहीं ठिकाणीं सात दिवस हा सण साजरा होत असल्याने याकाळात विविध लोकोत्सवाचे कार्यक्रम साजरे होतात.
होळीला वेगळे महत्व..
होळी पौर्णिमा सन म्हणजे वाईटावर विजय, श्रीकृष्ण आणि रधा यांच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. याच काळात कपटी राक्षस हिरण्यकश्यप या राक्षसाचा विष्णूच्या नृसिंह या अवताराकरवी वध झाला अन् भक्त प्रल्हाद याची भगवान विष्णूप्रती असलेली भक्ती सिद्ध झाल्याचे मानले जाते.. विशेषकरून शहरी भागात होळीचे दहन केले जाते तर ग्रामीण भागात जंगलातून लाकूड आणून त्याची उभारणी करून पूजा केली जाते. काहीं ठिकाणीं पाच तर काहीं ठिकाणीं सात दिवसांचा हा सण असतो.
लोकसंस्कृतीचे ग्रामीण भागात जतन…
लोकांच्या मुखातून लोकांनी तयार केलेल्या लोकसंगीत, रदमाले, देवांच्या उपासनेवर आधारीत लोकसंगीत गायले जाते. त्याचे याकाळात प्रत्येक गावात जावून घरोघरी सादरीकरण केले जाते.
कोकण भागांत मोठ्या प्रमाणात उत्सव..
जांबोटी पश्र्चिम भागातील कणकुंबी, चीगुळे, पारवाड, तर झाली गोवा हद्दीत केरीसह कोंकण भागांत या उत्सवाला अधिकच उधाण येते. अनेक वर्षापासुन चालत आलेल्या या पारंपरिक सणाचे आजही या भागात जतन केले जाते.
चौकट –
मान येथे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी रद्दमाले, रोंगाट स्पर्धांचे आयोजन…
कणकुंबी भागांत वसलेल्या मान ( ता. खानापूर) या गावात शनिवार (दि. 15) आणि रविवार असे दोन दिवस शाळकरी विद्यार्थ्यांसाठी लोकउत्सवातील विविध सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 1 ली ते सातवी गटातील मुलांसाठी रद्दमाले, रोंगाटसह विविध ग्रामीण कला सादर केल्या जाणार आहेत..

Leave a Reply