October 17, 2026

आमचे मानधन वाढवा; तालुका अंगणवाडी सेविकांचे खासदार -आमदारांना निवेदन!

0
IMG-20260930-WA0131

गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरूच; तरीही सरकारची डोळेझाक?

खानापूर:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

     स्थानिक पातळीवर आमचे मोलाचे काम असतानाही सरकार आमच्याकडे का दुर्लक्ष करते, वाढत्या महागाईबरोबर मानधनही वाढले पाहिजे, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून आम्हीं लढत आहोत तरीही सरकार सोयीस्कर डोळेझाकपणा आपण तरी या समस्येवर आवाज उठवावा अशी मागणीचे निवेदन खानापूर दौऱ्यावर असलेले खासदार विश्वेश्वर कागेरी -हेगडे आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांना तालुक्याच्या अंगणवाडी सेविकांच्यावतीने देण्यात आले. यावर योग्य तो आवाज उठवून तोडगा काढण्याबाबत प्रयत्न करू असे, आश्वासन दोन्हीं प्रतिनिधींनी दिले.

खासदार आमदारांच्यावतीने अंगणवाडी सेविकांचा सत्कार…

    यावेळी खासदार विश्वेश्वर कागेरी -हेगडे  आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा भाजप उपाध्यक्ष संजय कुबल, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *