हब्बनहट्टी मराठी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश युवक मंडळाकडून शाळा सुधारणा कमिटीचा सत्कार!
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; भजन, नृत्य, डोळे बांधून नारळ फोडणे स्पर्धां झाल्या…
हब्बनहट्टी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
हब्बनहट्टी मराठी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल हब्बनहट्टी हनुमान नगर येथील श्री गणेश युवक मंडळाच्यावतीने शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष – उपाध्यक्ष, सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संगीत, नृत्य, डोळे बांधून नारळ फोडणे सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक पी टी. कोराणे, सहशिक्षक संभाजी सावंत यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश युवक मंडळाचे अध्यक्ष शंकर गावडे, उत्सव कमिटीचा अध्यक्ष तानाजी गावडे, उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, सचिव नरेश गावडे , शिवाजी ई .गावडे , नानू ल. घाडी , सूत्रसंचालन नामदेव अ. पाटील यांनी केले तर नरेश गावडे आभार मानले. यावेळी
समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.
