October 18, 2026

वडगावच्या (जांबोटी) ‘आड’ आलेली मोबाईल ‘रेंज’ समस्या तात्काळ दूर करा!

0
IMG_20260924_144445

शासकीय बीएसएनएल नेटवर्क कंपनीला गावकऱ्यांचे निवेदन; समस्येची दखल घेण्याची कंपनीकडून हमी!

खानापूर :लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       जांबोटीचे जुळे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगावला सर्व योजना पोहचल्या असल्या तरी इंटरनेट, दूरध्वनी ( मोबाईल) रेंजपासून अद्याप वंचित राहिले आहे, याचा अधिक फटका उद्याचे भविष्य म्हणून समजल्या जाणाऱ्या शाळकरी मुलांना बसत आहे. परिणामी दररोज गाव सोडून किलो मीटरच्या अंतरावर येऊन मुलांची शिक्षकांच्या अटेंडर ऑनलाईन व्यवस्था पूर्ण कराव्या लागत आहेत. जग चंद्रावर गेले तरी या गावात अद्याप मोबाईल रेंज नसल्याने सुधारित यंत्र – तंत्रांचा उपयोग काय? असाच प्रश्न पडतो! पूर्वीची पिढी गेली तरी आताच्या युवकांना याची चांगली जाण असून, इंटरनेटशिवाय पर्यायही उरला नाही.

त्यामुळे माजी जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई, वडगांव मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर दळवी यांच्या पुढाकाराने तसेच जांबोटी कृषी पत्तीन संघांचे अध्यक्ष जयवंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएसएनएल च्या वरिष्ठ मॅनेजरना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बीएसएनएलचे व्यवस्थापक देवेंद्र व सहाय्यक व्यवस्थापक श्री.वेठे यांना भेटून समस्येबद्दल नागरिकांनी माहिती दिली.

आ. विठ्ठल हलगेकर यांचे मार्गदर्शन; आठ दिवसात सर्वे करणार!

    वडगांव नागरिकांनी प्रथमता आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन या समस्येबद्दल माहिती दिली, त्यावर आमदारांनी बीएसएनएल शी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर गावकऱ्यांनी कंपनीची भेट घेऊन समस्या मांडली. यावर आठ दिवसात सर्वे करून समस्या मार्गी लावण्याची हमी बीएसएनएलने दिली आहे. त्यानुसार त्यांना वडगाव गावच्या रेंजची अडचण दूर करावी अशीच मागणी करण्यात येत आहे.

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *