विजयनगर जिल्ह्यात प्रजासेवा कार्यक्रमात केली घोषणा; या घोषणेने सरकारी शाळांतील विद्यार्थी गळती थांबणार…
विजयनगर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
ग्रामीण भागातील गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थांसाठी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून, ग्रामीण भागात पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेत घेतलेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील महत्त्वाच्या नोकऱ्यांमध्ये 7.5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा विजयनगर येथील प्रजासेवा कार्यक्रम शुभारंभप्रसंगी केली आहे. लवकरच याबाबत अधिकृत अध्याध्येश काढण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
राज्य नागरी सेवा भरतीत 25 टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रमात 15 टक्के आहे राखीव…
ग्रामीण भागात पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य नागरी सेवेच्या भरतीत थेट 25 आरक्षण असून, व्यावसायिक अभ्यासक्रमात 15 टक्के राखीव ठेवण्यात आले आहे. आता आणखी 7.5 टक्के आरक्षणाने मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसेवा खात्याचे कार्यालय शनिवारपासून सुरू…
राज्यासाठी महत्त्वाची सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसेवा खात्याचे कार्यालय शनिवारपासून सुरू असून, येथील सेवाही सुरू करण्यात येतील. पालकमंत्री आमदारांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा अभियान सुरू करण्यात आले असून, पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बैठक घेऊन तक्रारी तुमच्या समाधान आमचे या योजनेखाली प्रजासेवा कार्यक्रमातून 21 दिवसांत लोकसेवातील समस्या दूर करण्यात येतील असेही मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.