माय मराठीचा डंका – हब्बनहट्टी मराठी शाळा आदर्श!

0

जांबोटी भागातील हब्बनहट्टी प्राथमिक मराठी शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार प्रदान;; शिक्षक,शाळा सुधारणा समितीचे प्रयत्न फळाला……


IMG_20260905_182425

जांबोटी भागातील हब्बनहट्टी प्राथमिक मराठी शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार प्रदान;; शिक्षक,शाळा सुधारणा समितीचे प्रयत्न फळाला

हब्बनहट्टी: लोकहित न्यूज ( वर्षा विलास कवठणकर)

    माय मराठीचा डंका आदर्श पुरस्कापर्यंत पोहचला आहे, हब्बनहट्टी मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे उत्तम ‘शिक्षणदान‘ आणि शाळा सुधारणा समितीचे अथक प्रयत्न यामुळे या शाळेला यंदा आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाला असून, जांबोटी भागासह तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे, हेच माय मराठीचे वैशिष्ट्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आजही मातृभाषाच जिल्ह्यात सरस अर्थात पुढे असल्याचे दिसून येते. लोकहित न्यूज तर्फे हब्बनहट्टी मराठी शाळेचे कोटी कोटी अभिनंदन!

   

आजच्या शिक्षक दिनानिमित् आमदारांच्याहस्ते पुरस्कार प्रदान!

       आज खानापूर तालुक्यातील शुभम गार्डन मध्ये मोठ्या थाटात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सुंदर शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्ष तानाजी गावडे, उपाध्यक्ष अनंत ल. गावडे,सदस्य  मारुती (अक्कू)गावडे, कल्लाप्पा पाटील, धनाजी गावडे, कृष्णा सुतार , हब्बनहट्टी गावचे पंच शंकर गावडे मुख्याध्यापक पी. कोराणे, सहशिक्षक संभाजी सावंत , शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा कौदलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जांबोटी सीआरसी विठोबा दळवी, बीईओ हत्ती सर, बीईओ ऑफिसर श्री कमार सर, इओ रमेश मेस्त्री, मठाधिश चन्नबसवदेवरु आदी मान्यवर उपस्थित होते.

   

   


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed