जांबोटीत पिसाळलेल्या कुत्र्यांना धोका; जंबोटीतील नाक्यावर आज सकाळी एकाला चावा घेतल्याने एक जण जखमी पंचायतीने बंदोबस्त करावा…

0

लहान मुले, वृद्ध, महिलांना अधिक धोका; नागरिकांनीही सतर्क रहावे…   (कुत्र्यांचा संग्रहित फोटो) जांबोटी: लोकहित…


Screenshot_20260905_080054

लहान मुले, वृद्ध, महिलांना अधिक धोका; नागरिकांनीही सतर्क रहावे…

  (कुत्र्यांचा संग्रहित फोटो)

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        चार पिसाळलेली कुत्री जांबोटी बसस्थानक, नाका आणि गावात फिरत असून, त्यांच्याकडून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. आज सकाळी  जांबोटी नाक्यावर एकाला कुत्र्याचा चावा घेतल्याने सदर व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे, शिवाय याआधी आणखी चार जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. जांबोटी ग्राम पंचायतीने अशा कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी केली जात आहे. तसेच नागरिकांनीही अशा कुत्र्यांपासून सतर्क राहण्याची गरज आहे.

महिला वृद्ध आणि मुलांना अधिक धोका…

   जांबोटी स्थानक अंक आणि परिसरात कुत्र्यांचा मोठा कळप वापरत असून, त्यातील कोणती कुत्री पिसाळलेली आणि कोणती चांगली हे कळणे कठीण बनले आहे. अशा कुत्र्यांपासून लहान मुले वृद्ध आणि महिलांना अधिक धोका निर्माण झाला आहे, तरी सर्वांनी सावधगिरीने वावरण्याची आवश्यकता अधिक. ग्राम पंचायतीने अशा कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून, पशु संगोपन खात्याचीही मदत घ्यावी अशी मागणी होत आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed