ब्रेकिंग न्यूज – मुख्यमंत्री डीकेंना धक्का; मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा…

0

काहीं दिवसांपूर्वी विरोधी भाजपने राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलने केली होती… बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )…


Screenshot_20260828_194604

काहीं दिवसांपूर्वी विरोधी भाजपने राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलने केली होती…

बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

    मागासवर्गीय निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप असलेल्या राज्य मागासवर्गीय खात्याचे मंत्री बी. नागेंद्र यांनी अखेर काहीं क्षणात आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर 3 जून ला डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा आपल्या हाती घेतली होती, त्यानंतर त्यांनी कमी काळातच काहीं चांगले धाडशी निर्णय घेतले होते. मात्र, तितक्याच राजकीय गणित बिघडले अन् बी.  नागेंद्र यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधी भाजपने त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती. तेवढेच नाही तर गेल्याच आठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने राज्यभर छेडली होती. शिवाय भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत शीतयुद्ध रंगले होते. अखेर आज बी. नागेंद्र यांनी आपले पद त्यातले आहे. कॅबिनेट मंत्री रामलिंग रेड्डी यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, काहीं दिवस आधीच त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed