म.ए समितीकडून दाखल; मराठी शिक्षक जगांसाठी ‘उद्या’ जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना देणार निवेदन….

0

मराठी बांधवांनो, जागृत व्हा! आपल्या हक्कासाठी बेळगावात एकत्र या; म. ए. समितीकडून आवाहन… कर्नाटक राज्यातील…


IMG_20260817_165522

मराठी बांधवांनो, जागृत व्हा! आपल्या हक्कासाठी बेळगावात एकत्र या; म. ए. समितीकडून आवाहन…

कर्नाटक राज्यातील शिक्षक भरतीमध्ये ‘मराठी माध्यमाच्या’ शाळांवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही!

खानापूर :लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

   कर्नाटक शासनातर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांसाठी जागा न ठेवता, मराठी भाषिक शिक्षकांना आणि शाळांना जाणीवपूर्वक डावलण्याचे धक्कादायक धोरण समोर येत आहे. हा आपल्या मातृभाषेवर आणि भावी पिढीच्या शिक्षणावर थेट हल्ला आहे. या अन्यायाविरुद्ध प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि मराठी माध्यमाच्या जागा त्वरित मंजूर कराव्यात या मागणीसाठी बेळगाव येथे **डीडीपीआय (DDPI) कार्यालयावर धडक देण्यात येणार असून, एक जाहीर निवेदन सुपूर्द केले जाणार आहे.
आपल्या सीमाभागातील मराठीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि डी.एड., बी.एड. धारक तरुण-तरुणींच्या रोजगाराचा हक्क हिरावून घेणाऱ्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे.

लोकहित न्यूज वृत्ताचे कौतुक…

   आजच लोकहित न्यूज ने मराठी शिक्षक भरती आणि परिस्थितीवर प्रकाश टाकला, त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून, त्या वृत्ताचे तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे….

उद्या  मंगळवारी (दि.18 ) देणार निवेदन…

मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता
डीडीपीआय (DDPI) कार्यालयात हजर राहून देणार निवेदन.
यातील प्रमुख मागणी कर्नाटक शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांसाठी न्याय्य जागांची त्वरित तरतूद करत योग्य न्याय देणे अशी आहे.

आवाहनकर्ते (खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती)
गोपाळराव देसाई (अध्यक्ष)दिगंबरराव पाटील (माजी आमदार) मुरलीधर पाटील (कार्याध्यक्ष) निरंजन सरदेसाई (कार्याध्यक्ष)
आबासाहेब दळवी (सरचिटणीस) यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे. तरी यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकारिणी सदस्यांनी तसेच सर्व मराठी भाषिक संघटनांचे प्रतिनिधी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, डी.एड/बी.एड धारक उमेदवार, शिक्षक, पालक आणि तमाम मराठी प्रेमी बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपली एकजूटच प्रशासनाला नमवू शकते.

चला, मराठीच्या रक्षणासाठी, मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी बेळगाव डीडीपीआय ऑफिसकडे कूच करूया…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed