सहकार भारतीतर्फे कृषी पत्तीन अध्यक्ष, संचालकांसाठी रविवारी पारीश्वाड येथे ‘अभ्यास वर्ग ‘ ! लाभ घ्या: आ. विठ्ठल हलगेकर…

0

     पारिश्ववाड हनीव्हल इंटरनॅशन स्कूलमध्ये आयोजन; सहकार भारती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर , मुख्य सचिव…


IMG_20260812_224708

    

पारिश्ववाड हनीव्हल इंटरनॅशन स्कूलमध्ये आयोजन; सहकार भारती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर , मुख्य सचिव डॉ. सुधाकर व्ही. महेंद्रकर यांचे मार्गदर्शन लाभणार…

   

खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

     कृषी पत्तीन संचालक,अध्यक्ष यांना विशेष मार्गदर्शन मिळावे, सहकार खात्याच्या विविध उपक्रमाबद्दल तसेच कारभार कसा चालवावा याबद्दल सहकार भारतीतर्फे कृषी पत्तीन संचालक -अध्यक्ष यांच्यासाठी ‘अभ्यास वर्ग ‘ चे रविवार दि. 16 रोज पारीश्वाड (ता.खानापूर) येतील होणिव्हल स्कूलमध्ये सकाळी 10 वाजता, आयोजन करण्यात आले असून, तालुका आणि जांबोटी पश्चिम भागातील कृषी पत्तीन संचालक, अध्यक्षांनी बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे.

       

जिल्हा सहकार भारती अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर, सचिव डॉ सुधाकर व्ही. महेंद्रकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार…

      सहकार खात्यातील अभ्यासक तसेच जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर, सचिव डॉ सुधाकर व्ही. महेंद्रकर यांचे यावेत मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून, त्यांच्याकडून सहकार खात्यातील अमुलाग्र बदलांबद्दल यावेळी महिती देण्यात येणार असल्याचेही आमदारांनी लोकहित न्यूज’शी बोलतांना सांगितले.

सदर अभ्यास वर्गाच्या माध्यमातून कृषी पत्तीन क्षेत्रात ‘अमुलाग्र ‘ बदलाची अपेक्षा…

     सहकार क्षेत्रातील कृषी पत्तीन विभाग हा शेतकऱ्यांसाठी मोलाचा असून, त्याद्वारे सर्वकाही नंदनवन होणे अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने सहकार भारतीतर्फे कृषी पत्तीन संचालक -अध्यक्ष यांच्यासाठी अभ्यास वर्ग घेण्यास येणार आहे, त्यातून बरेच काहीं शिक्षणासारखे असून, सर्वांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे.

      


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed