
नवीन कायद्यानुसार जयवंत देसाई अध्यक्ष तर किरण साबळे उपाध्यक्षपदी विराजमान; अन् एकच जल्लोष!
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जुन्यावर नवीन थाट या उक्तीप्रमाणे जांबोटी कृषी पत्तीनच्या अध्यक्ष -उपाध्यक्षपदाचे राजकारण तापले आहे, जुन्या कायद्यानुसार माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी मृत व्यक्तीच्या नावे प्रतिनिधी (प्रॉक्सी) मतदान केल्याचा आरोप करत डीआरओंकडे तक्रार दाखल केली होती, त्यानुसार त्यांनी आजची निवड पुढे ढकलण्याचा आदेश बजावला होता. पण, काय करणार जुन्यापुढे नव्याने चालले नाही. अखेर गेल्यावर्षीच सहकार खात्याने आणलेल्या नवीन कायद्यानुसार संबंधित सोसायटीच्या (कृषी पत्तीन संघ) सचिवांना अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच आज जांबोटी कृषी पत्तीनची निवडणूक पार पडली, जयवंत देसाई अध्यक्ष तर किरण साबळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन् सर्वत्र एकच जल्लोष साजरा होतांना दिसत आहे. यावेळी सर्व नूतन संचालक उपस्थित होते, त्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला… यावेळी माजी अध्यक्ष मधुकर देसाई, जांबोटी पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई, मिलिंद डांगे, मनोहर नाईक आदी उपस्थित होते.
कशी झाली ही निवड; अन् ते मत कोणत्या कायद्यानुसार ग्राह्य!
आजची ही निवड सहकार खात्यानेच 2025 साली आणलेल्या नवीन कायद्यानुसार संबंधित सोसायटीच्या (कृषी पत्तीन संघ ) सचिवांना अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडण्याचा अधिकार आहे, त्यानुसार आजची निवड करण्यात आली. तर मृत व्यक्तीच्या नावे प्रतिनिधी (प्रॉक्सी) मतदानही सहकार खात्याच्या नवीन कायदा 29 नुसार ग्राह्य धरण्यात आले आहे… त्यामुळे हिथेच हा वाद संपल्यात जमा असून, सत्ताधारी गटाने बाजी मारल्याचे दिसत आहे…






Leave a Reply