माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांची डिआरओंकडे तक्रार; पुढील आदेशापर्यंत अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीची करावी लागणार प्रतीक्षा!
बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मागच्या महिन्यात अटीतटीने पार पडलेल्या जांबोटी कृषी पत्तीनचा राजकीय राग आता जाऊन पोहचला डीआरओंच्या न्यायालयात ! आणि त्यामुळेच आता आज (ता. 6) रोजी होणारी अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड पुढे ढकलण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत ही निवड स्थगितच असेल. माजी जांबोटी कृषी पत्तीन अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी 22 मार्चला झालेल्या मतमोजणीवर आक्षेप घेत कर्नाटक सहकारी संस्था अधिनियम 1959 च्या कलम 70 अंतर्गत खटला दाखल केला होता. त्यानुसार डीआरओंनी वरील आदेश बजावला आहे.
धनश्री सरदेसाई यांची काय आहे तक्रार !
मतदार यादीतीलतील अनुक्रमांक 678 मतदान क्रमांकाच्या मृत व्यक्तीच्या नावावर प्रतिनिधी (प्रॉक्सी) मत देण्यात आल्याचा संघाच्या माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांचा आरोप असून, त्यांनी कर्नाटक सहकारी संस्था अधिनियम 1959 च्या कलम 70 अंतर्गत तक्रार केली होती. त्याची दखल घेत डीआरओंनी आज होवू घातलेली अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडणूक पुढे ढकलली आली. या कृषी पतींनमधील मतदार अनुक्रमांक 678 च्या मृत व्यक्तीच्या नावे प्रतिनिधी (प्रॉक्सी) मतदान केले आहे, परंतु, सदर व्यक्ती 18 जून 2021 मृत पावली आहे. याच एका मतदानामुळे वादी आणि प्रतिवादी क्रमांक 13 साठी दोन्हीं उमेदवारांचे बळ सेम झाले आहे, सदर एक मत बाद ठरवल्यास वादीचा अर्थात तक्रारदाराचा विजय निश्चित आहे., असा युक्तिवाद वादीच्या वकिलांनी केला आहे. त्यावर विचार करत डीआरओंनी आजच्या दिवशी होणारी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 31 मार्चला हा आदेश जारी केला आहे…
सेम झाले होते पण, चिठ्ठी दोन्हीं उमेदवारांना विचारूनच उडवली!
बिनकर्जदारसाठी माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई आणि किरण साबळे यांच्यात चुरस लागली होती, ती निवडणुकीच्या निकालापर्यंत वाढतच गेली. निकालवेळी झाले असे की , अरविंद पाटील गटाचे उमेदवार किरण साबळे यांच्या बाजूने एक मत वाढले होते, पण, चुकीच्या पद्धतीने अंगठा मत मारल्याने ते मत निवडणूक अधिकाऱ्यांकडून बाद ठरवण्यात आले. पण, ते मत सोडून दोन्हीही उमेदवारांची ताकद सेम झाली होती. अशावेळी करावे काय? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला अन् चिठीचा पर्याय ठरवण्यात आला. त्यासाठी दोन्हीं उमेदवारांना विचारण्यात आले शिवाय त्या प्रक्रिया फॉर्मवर दोघांच्याही सह्या घेण्यात आल्या. अखेर त्यामध्ये किरण साबळे विजयी झाला.
प्रतिक्रिया
कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, त्या आदेशाला आव्हान देण्यास येईल. ज्या मृत व्यक्ती मताबद्दल तक्रार आहे, ते मत नवीन कायद्यानुसार घेण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया अरविंद पाटील गटाकडून देण्यात येत आहे… या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोहचवण्यात येईल…






Leave a Reply