आजपासून आयपीएलचा धूम धडाका; आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात पहिला सामना!


दिल्ली, मुंबईसह सर्वच संघ यंदा बलाढ्य; मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आपले गतवैभव राखणार?…

     

मुंबई: लोकहित क्रीडा न्यूज (विलास कवठणकर)

         जगातील सर्वांत श्रीमंत लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 19 हंगामाला आजपासून प्रारंभ होत असून, मागच्या वर्षीचा विजेता आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात सायंकाळी 7.30 वाजता पहिला सामना रंगणार आहे. यंदा मुंबई , दिल्लीसह सर्वच संघ तगडे असल्याने गतवर्षीचा बंगळूर विजेता कप कायम ठेवणार की, दिल्ली, हैदराबादसह इतर संघ यंदा बाजी मारणार हे काही दिवसातच दिसून येईल. पाचवेळा विजेता ठरलेल्या मुंबई आणि चेन्नई संघही यंदा चांगले असल्याने दोन्हीं संघ आपलं गतवैभव कायम राखणार?.. असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे .

कॅप्टन कुल धोनीचा हा अखेरचा हंगाम?….

      जगात कॅप्टन कुल नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि चन्नई सुपर किंग्ज पाचवेळा कप मिळवून देणाऱ्या या संघाची ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाचा हंगाम शेवटचा असेल का? असा चाहत्यांना सतावणारा प्रश्न क्रिकेट वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. यंदा रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिग धोनी या दिग्गजांकडेच सर्वांचे लक्ष लागून असेल. हे तिघेही फॉर्मात असल्याने ते नक्कीच आपली चमक दाखवतील अशी चाहत्यांना आशा आहे…

आजच्या सामन्याची वेळ, सामना कुठे कुठे पाहू शकाल….

        सायंकाळी 7.30 मिनिटांनी सामना सुरू होईल, जीओ हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स 1,2 व हिंदी स्टार स्पोर्ट्स 2 वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण असेल… आजचा बंगळूर आणि हैदराबाद यांच्यातील सामना बंगळूर चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगेल…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *