जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
जांबोटी कृषी पत्तीनवर अरविंद पाटील पॅनेलची सत्ता ;लोकहित न्यूजचा अंदाज ठरला खरा….

जांबोटी कृषी पत्तीनचे इलेक्शन म्हणजे जणू आमदार खासदार निवडणूकच अशी परिस्थिती निर्माण झाली होती. धनश्री सरदेसाई आणि किरण साबळे यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली होती. या सीटसाठी मोजणी पूर्ण झाली त्यात किरण साबळेच्या बाजूने एक (अंगठा) मत जादा होते पण, ते बाद ठरवण्यात आले. तर एक मत चिठ्ठी कोरीच होती. अशावेळी री काउंट करायचे की, लहान मुलाच्या हातून चिठ्ठी उडवायची असा प्रश्न निर्माण झाला. अखेर तासानंतर ऋतिका अविनाश पेडणेकर या मुलीला चिठ्ठी उडवण्यासाठी आणण्यात आले अन् तिने किरण साबळेचे नशीब उघडले. तर दुसरीकडे माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांना प्रभावाला सामोरे जावे लागले.
इलेक्शन जांबोटीत चर्चा जिल्ह्यात….
जांबोटीत निवडणूक पण , याची चर्चा जिल्ह्यात अशी चुरशीची निवडणूक रंगली होती. जांबोटी राजवाडा व माध्यमिक विद्यालयाच्या बाजूने समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांना एकच धाकधुक होती. अलिकडच्या काळात पहिल्यांदाच इतक्या चुरशीने ही निवडणूक झाली.
मतदान पॅनेल टू झाले नाही…. तर व्यक्ती पाहून झाले मतदान…
वैयक्तिक संबंधावर हे मतदान झाले तर दुसरीकडे वयक्तिक वेगवेगळ्या रागातूनही एकमेकाला विरोध झाल्याचे पहायला मिळाले. दोन पॅनेल होते, त्यानुसार प्रचारही झाला पण, मतदान हे व्यक्ती पाहूनच झाले. धनश्री सरदेसाई व माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांनी आपला राजवाडागड राखला. यामध्ये काका पुतण्यामध्ये लढत पडली होती. राजकुमार देसाई आणि चंद्रकांत देसाई अशी ही लढत होती. अखेर काकाने पुतण्याला पराभूत केले.
चापगावनंतर जांबोटीत अरविंद पाटलांची सत्ता…
दोन महिन्यापूर्वी चापगाव कृषी पत्तीनवर डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांनी विजय मिळवला, त्यानंतर जांबोटीतही तीच परंपरा कायम राखत सत्ता काबीज केली आहे. लोकहित न्यूजने आधीच अंदाज बांधला होता, तो अखेर खरा ठरला… त्याबद्द्ल लोकहित न्यूजचे सत्ताधाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे…







Leave a Reply