शनिवारी रात्री प्रचार संपला; आज जांबोटी मराठी उच्च प्राथ. व कन्नड शाळेमध्ये शेतकऱ्यांचे मतदान….
ओलमणी: लोकहित न्यूज
अटीतटीच्या सामन्यांत प्रचार रंगलेल्या जांबोटी ( नीलावडे) कृषी पत्तीनसाठी निवडणूक प्रचार शनिवारी रात्री संपला, त्यावेळी अरविंद पाटील पॅनेलची बाजू वरचढच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज जांबोटी मराठी उच्च प्राथ व कन्नड शाळेमध्ये दोन्हीं गटांसाठी शेतकरी मतदानाची बाजू बजावतील. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे याकडे लक्ष लागून आहे. बदल घडवण्यासाठी आम्ही रिंगणात आहोत असे सांगत अरविंद पाटील पॅनेलच्या उमेदवारांनी ओलमणी, वडगांव, जांबोटीवाडा,जांबोटी पेठेसह कापोली गावामध्ये जोरदार प्रचार केला आहे.
प्रचारात जोर विजयाची नांदी…..
तीनच दिवसांचा प्रचारकाळ मिळाल्याने नियोजनबद्ध, शेतकरी टू शेतकरी, घरपती जागृती करण्यात आली. यासाठी माजी आमदार तथा डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील, माजी जांबोटी ग्राम पंचायत अध्यक्ष महेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील व त्यांच्या उमेदवारांनी जोरदार कस लावला आहे. त्याला नक्कीच यश मिळणार असा आत्मविश्वास माजी जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.
एकूण 12 जागांसाठी मतदार; बिनकर्जदारसाठी काँटे की टक्कर !
जांबोटी कृषी पत्तीनसाठी एकूण 12 जागांसाठी आज मतदान पार पडेल, त्यामध्ये बिनकर्जदार सीटसाठी काँटे की टक्कर असेल. या सीटवरच दोन्हीं गटांचे बारीक लक्ष असेल. कारण की, या सीटवरच पुढचे राजकारण अवलंबून असेल असे चित्र आहे….






Leave a Reply