आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज सात कामांचा नारळ फोडणार…..


यात्रा नियोजन निधी, सीसी रस्ता, बांधकाम खाते रस्ता कामांचे आज भूमिपूजन होईल

कक्केरी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल सोमांना हलगेकर यांच्या हातून आज सात कामांचा नारळ फुटणार आहे. यामध्ये लक्ष्मी यात्रा, ग्रामदेवता यात्रा, सीसी रस्ता, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याचा समावेश आहे.

कुठे आणि किती वाजता, कोणत्या कामाचे भूमिपूजन होईल ..

     सकाळी 9.30 मिनिटांनी भुरंकी गावातील मऱ्याम्मा देवी मंदिराचे भूमिपूजन, 11 वाजता तोलगी गावातील आगामी लक्ष्मी यात्रेनिमित सीसी रस्ते, बोअरवेलसह विविध कामांचे भूमिपूजन, 12 वाजता चिकदीनकोप्प गावातील सीसी रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी 1 वाजता करंबळ गावातील महालक्ष्मी मंदिराजवळील मूलभूत सुविधांचे भूमिपूजन, सायंकाळी 5 वाजता यडोगा आणि चापगाव मधील  बांधकाम खात्याच्या रस्ता सुधारणा व  रुंदीकरणाचे भूमिपूजन, त्यानंतर सायं.7 वाजता गर्लगुंजी गावच्या बांधकाम खात्याच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणेचे भूमिपूजन होईल तरी त्या त्या गावच्या नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन आमदारांच्यावतीने करण्यात आले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *