आम्ही ओरिजनल नव्हे,नमी कमी, कुठेच पडणार नाही कमी! असा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय कोणाच्या दिशेने?
खानापूर: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) राजकीय विश्लेषन
काल माजी आमदार अरविंद पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला अन् काहीं कालांतराने विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांचा एक दमदार चेतावणी देणारा विडिओ सर्व ग्रुप, त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांच्या स्टेट्सवर झळकला आणि तालुक्यातील कार्यकर्ते, जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे, ही चेतावणी अर्थात जोरदार इशारा कोणासाठी अन् कोणाच्या दिशेने म्हणावं! हेच कळेना! काल नुकतेच म.ए . समितीतून भाजपवासी झालेल्या माजी आ. अरविंद पाटील यांचा भाजप पार्टी हॉलमध्ये बेळगांव ग्रामीणचे माजी आ. संजय पाटील यांच्या उपस्थित हा वाढदिवस सोहळा पार पडला. त्यावेळी बोलतांना माजी आ. संजय पाटील यांनी विठ्ठल हलगेकर यांनी आमदार होण्यास मा. अरविंद पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे, असे वक्तव्य केले. तर त्या कार्यक्रमामध्ये आमदार विठ्ठल हलगेकर यांची अनुपस्थिती मात्र, प्रकर्षाने जाणवली अर्थात् त्यावेळी ते उपस्थित का? नव्हते बर हाही प्रश्न तालुक्याला पडला आहे. एकाच पक्षात राहून त्यांच्यामध्ये सर्वकाही अलबेल नाही का? असे वेगवेगळे तर्क वितर्क काढले जात आहेत. त्यात लगेच काहीं तासानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांचा आम्हीं ओरिजनल नाही नमी कुठेच, आम्हाला कोणी समजू नये कमी,पडणार नाही कुठे कमी !असा जोरदार इशारा देणारा व्हिडिओ सर्व ग्रुपवर वायरल झाला, शिवाय त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या स्टेट्सवर दिसून आला अन् एकच प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे हा इशारेबाज व्हिडीओ कुणाच्या दिशेने आणि कुणासाठी इशारा समजावं बर, हे कोडं उलगडणे तालुक्यातील जनतेला कठीण होऊन बसले आहे.
आमदार हलगेकर आणि मा. आ अरविंद पाटील यांचं डीसीसीमध्ये बरच गासल होतं, त्यानंतर ते दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले.. पण….??
आमदार विठ्ठल हलगेकर आणि मा आ. अरविंद पाटील यांचं डीसीसीमध्ये बरच गासल होतं, त्यानंतर ते अनेक सभा, आंदोलने, पत्रकार परिषदेसह सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आले खरे पण, दोघांमधील तितकं प्रेम थोड ढिम्म अर्थात कमी दिसून आलं. त्यावरून या दोघात सर्वकाही अलबेल नाही का? असा भला मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे, शिवाय भाजप पार्टीचेही नेते थोडे हिकडे अन् थोडे तिकडे सध्या दिसून येतात ,शेवटी ते भाजप पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येतीलच यात काहीं शंका नसेल. पण सध्या तरी जरा वेगळं चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे आमदार विठ्ठल हलगेकर यांचा तो इशारा व्हिडिओ कुणासाठी आहे, आणि तो कालच का? टाकण्यात आला यावर अनेक राजकीय तर्क वितर्क राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहेत. थोड्याच दिवसात जिल्हा पंचायत, तालुका पंचायत इलेक्शन लागणार आहे, त्यावेळी नेमके काय ते चित्रं स्पष्ट होईलच, पण, सध्या इशारा त्यातीलच एक भाग आहे का? हे कळेनासे झाले आहे, सध्या जांबोटी कृषी पत्तीनसाठी मा. आ.अरविंद पाटील आणि भाजपच्या आघाडीच्या नेत्या धनश्री सरदेसाई या दोन्हीं भाजपच्याच नेत्यांमध्ये जोरदार लढत सुरू आहे, यामध्ये आमदार हलगेकर कोणत्या बाजूने वजन ठेवणार हा प्रश्न निर्माण झाला असतांना, त्याचे उत्तर धनश्री सरदेसाई यांच्याच बाजूने असेल असा राजकीय अंदाज बांधला जात आहे.
भाजपमधील बहुतेक कार्यकर्त्यांची फळी मा. आ. अरविंद पाटील यांच्या बाजूने दिसते , का बर यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांचं नेतृत्व मान्य नाहीत का?…
जे कार्यकर्ते गावागावात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारादरम्यान जोरदार प्रचार करत होते, ते अलीकडच्या काळात मा. आ. अरविंद पाटील यांच्या बाजूने दिसतात. का बर त्यानं आमदार विठ्ठल हलगेकर यांचं नेतृत्व मान्य नाही असं अर्थ लावावा का? हे कार्यकर्ते आमदार हलगेकर यांच्या संपर्कात कमी दिसतात, त्यांचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे जाणे येणेही जरा कमीच दिसते. मध्यंतरी यातील काहींनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याबद्दल काही बोलले होते, त्या संदर्भात चर्चावाद झाला होता. त्यानंतर वरवर बोलणे चालणे सुरू असले तरी मनातील ते गेल नाही असेच दिसते आहे. शेवटी सर्वच कार्यकर्त्यांना पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र यावे लागणार हे नकीच… पण तोपर्यंत चालू आहे हे कुठपर्यंत जाणार हे देवासचं ठाऊक…. तिथपर्यंत वेट अँड वॉच…
(लोकहित न्यूजने घेतलेला हा छोटासा आढावा, बघू यावर कोणाच्या प्रतिक्रिया आल्याच तर त्या आमच्या प्रिय वाचकापर्यंत नकीच पोहोचू…)…






Leave a Reply