म. ए. समितीचा आधारवड हरपला…


मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष , ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले….

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

            मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष व जेष्ठ नेते दीपक दळवी आज दुपारच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. आज सायंकाळी 8 च्या दरम्यान शहापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी माणूस पोरका झाला. सीमा लढ्यासाठी दळवी यांचे मोठे योगदान राहिले आहे. लोकहित न्यूज तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली….

सीमाप्रश्नासाठी लाभलेले खंबीर नेतृत्व, मोलाचे सहकार्य….

    साधे राहणे, सामान्य जनतेत थेट संपर्क, सीमा आंदोलनाची दिशा त्यांनी ठरवली. शेवटच्या श्वासापर्यंत ते सीमा प्रश्नासाठी लढत राहिले. त्यामुळे मध्यवर्ती समितीत त्यांचे एक वेगळेच स्थान होते.

प्रतिक्रिया

    दीपक दळवी साहेब थोर नेते होते, त्याचा आणि माझा जवळचा सहवास लाभला आहे. 2006 च्या खानापूर येथील महामेळाव्यात आम्हीं दोघेही अनेक दिवस हिंडलगा कारागृहात एकत्र राहिलो आहे. त्यांची सीमा लढ्यासाठी तळमळ अफाट मोठी होती. समितीच्या अनेक आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले अन् ते यशस्वीही करुन दाखवले.  त्यांच्या त्या महान कार्याला खानापूर तालुका समितीच्या वतीने मनाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली….

  – विलास बेळगावकर, माजी खानापूर तालुका समिती अध्यक्ष…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *