जांबोटी कृषी पत्तीनसाठी 49 अर्ज; आज माघारीचा दिवस….


माजी आ. अरविंद पाटील आणि माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई पॅनेलमध्ये जोरदार इर्षा, अरविंद पाटील यांचा चापगावनंतर जांबोटीतही सत्ता काबीज करण्याचा मनसुबा…

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या जांबोटी कृषी पत्तीन निवडणुकीचे राजकिय द्वंद युद्ध उद्यापासून सुरू होणार आहे. माजी आमदार तथा डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील आणि जांबोटी कृषी पत्तीनच्या माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांच्या दोन्हीं पॅनेलमधून एकूण 49 जणांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज (सोमवार 16) अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख असून, दुपारनंतर ठरणार रिंगणातील उमेदवार. अरविंद पाटील यांच्या पॅनेलमधून ओलमणीतील 9 इच्छुकांपैकी दोघे  सिलेक्ट होण्याचे चिन्ह असून, त्यामध्ये जोतिबा नावलकर आणि ॲड. दिनकर राऊत यांची नावे अधिक चर्चेत आहेत, यात विशेषकरून ओलमणीतच अधिक चुरस असेल असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर जांबोटी पेठेतून मंजुनाथ डांगे यांच्या नावावर अरविंद पाटील पॅनेलमधून शिक्का बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हे राजकारण रंगणारच; गावचे,सोसायटी राजकारण आणि वैयक्तिक राग असेल निशाण्यावर….

    संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधून असून, गावचे आणि सोसायटी राजकारण तसेच एकमेकांचा वयक्तिक राग या निवडणुकीतून दिसून येईल. त्यात ओलमणी आणि वडगावमध्ये अधिक चुरस असेल, शिवाय डीसीसी बँक आणि मार्केटींगचा वचपा यातून काढला जाईल. दखल झालेल्या अर्जांमध्ये देसाईंची संख्या अधिक असून, याव्यतरिक्त नवीन उमेदवारांची शोधाशोध दोन्हीं पॅनेलकडून सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे.

दोन्हींही पॅनेल भाजप  नेत्यांचेच; तालुका भाजप नेते कोणाच्या बाजूने प्रचार करणार?????

    नुकतेच समितीतून भाजपवासी झालेले माजी आमदार अरविंद पाटील व पूर्वीपासून भाजप नेत्या व पक्षाच्या तालुका पंचायत सदस्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळत्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई हे दोन्हींही नेते भाजपचेच असून, त्यांच्याच रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे तालुका भाजप नेते व भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कोणाच्या बाजूने प्रचार करणार??? असा प्रश्न निर्माण झाला असून, तो भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणारा आहे.

   


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *